आपल्या सगळ्यांनाच पोटॅटो चिप्स,फ्राईज,बटाटे वडे असे बटाट्याचे चमचमीत पदार्थ खायला खूपच आवडतात. मात्र, डाएट करणा-यांसाठी किंवा मधुमेही रूग्णांसाठी बटाटा खाणं म्हणजे विष खाल्यासारखंच आहे. पण, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी (Ref) नुसार, बटाट्यात पोषक तत्व आहेत. फार पूर्वी जीव वाचवण्यासाठी बटाटे खाल्ले जात होते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत बटाटे खाण्याचे फायदे…(potato) (diet) (dietfood)

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते
मधुमेहामध्ये बटाटे खाण्यास अनेकदा मनाई आहे. पण, एका संशोधनानुसार बटाटा रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. अभ्यासानुसार बटाट्याच्या आत प्रतिरोधक स्टार्च असतो, जो इन्सुलिनचा प्रभाव वाढवतो आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो.
बटाटा हे ग्लुटेन मुक्त अन्न आहे. जे प्रत्येकजण कोणत्याही भीतीशिवाय खाऊ शकतो. कारण, ग्लुटेन पदार्थ खाल्ल्याने काही लोकांना पोटदुखी, जुलाब, बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि त्वचेवर पुरळ उठणे यासारखी लक्षणे दिसतात.

[read_also content=”फक्त दारूमुळेच नाही तर, रोज खात असलेल्या पदार्थांमुळेही लिव्हर होतं डॅमेज https://www.navarashtra.com/lifestyle/liver-damage-due-to-some-food-also-410712/”]
पौष्टिकतेशिवाय बटाट्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. ज्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याच्या आहारात याचा समावेश करू शकता. उकडलेले बटाटे खाल्ल्यानेच वजन लवकर कमी होऊ शकते. (steam potato)

बटाट्यामध्ये पोटॅशियम असते, जे इलेक्ट्रोलाइट असते. हे पोषक तत्व शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. कारण, ते हृदय, स्नायू आणि मज्जासंस्थेच्या कार्यात मदत करते. बटाट्याच्या आत भरपूर पोषण असते. 1 बटाटा खाल्ल्याने तुम्हाला प्रथिने, फायबर, कार्ब्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, नियासिन आणि फोलेट पुरेशा प्रमाणात मिळू शकतात.






