सकाळी उठल्यानंतर अनेकांना भिजवलेले कडधान्य किंवा ड्रायफ्रुटस खाण्याची सवय असते. भिजवलेले कडधान्य खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. काहींची सुरुवात चहा कॉफीने होते तर काहींची सुरुवात भिजवलेले कडधान्य खाल्ल्याने होते. काही घरांमध्ये रात्रीच कडधान्य भिजत ठेवले जातात. मूग, मटकी, बदाम, मनुके, तांदूळ यांसारखे अनेक पदार्थ रात्री भिजत ठेवून सकाळी त्यापासून एखादा पदार्थ बनवून खाल्ला जातो. यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याऐवजी रात्रभर भिजत ठेवलेले कडधान्य खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे खाल्ल्याने तुमच्या शरीराला फायदे होतील. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते पदार्थ..(फोटो सौजन्य – iStock)
बदाम:
प्रत्येक ऋतूमध्ये भिजवलेले बदाम खाल्ले जातात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बदाम खाणे अत्यंत प्रभावी आहे. बदाम खाल्ल्याने पचनाची समस्या दूर होऊन शरीर निरोगी राहते. पोट स्वच्छ राहिल्यास आरोग्यासंबंधित इतर समस्या उद्भवत नाहीत. तसेच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते.
हरभरे:
भिजवलेले हरभरे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात फायबर आणि प्रथिने मिळतातयामुळे शरीरातील कमजोरी कमी होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर भिजवलेले हरभरे खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया व्यवस्थित राहते.
[read_also content=”चमकदार त्वचेसाठी कच्च्या दुधाचा वापर करून ‘अशा’ पद्धतीने बनवा फेस पॅक https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-prepare-raw-milk-face-pack-545246.html”]
भिजवलेले मनुके:
मनुक्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात, जे आरोग्यासाठी चांगले असतात. रात्रभर भिजत ठेवलेले मनुके सकाळी खाल्ल्याने शरीराला दुप्पट फायदे होतात. यामुळे केवळ आरोग्याचं नाहीतर केस आणि त्वचेला देखील फायदे होतात. रक्ताची कमतरता असल्यास तुम्ही सकाळी उठल्यानंतर मनुक्यांच्या सेवन करू शकता.
भिजवलेले मूग मटकी:
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात मूग मटकीची समावेश केला जातो. रात्रभर भिजत ठेवलेले मूग सकाळी उठल्यानंतर किंवा व्यायाम केल्याने शरीराला पोषक घटक मिळतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






