भारताचा किवींवर धावांनी विजय(फोटो-सोशल मीडिया)
IND vs NZ 5Th 20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात आली. या या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा धावांनी पराभव केला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत इशान किशनच्या शतक आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर ५ गडी गमावून २७१ धावा केल्या होत्या. प्रत्युउत्तरात न्यूझीलंडचा संघ अर्शदीप सिंगच्या ५ विकेट्समुळे १९.४ षटकात सर्वबाद २२५ धावाच करू शकला. परिणामी भारताने हा सामना ४६ धावांनी आपल्या खिशात टाकला. या विजयासह भारताने या मालिकेत ४-१ असा कब्जा मिळवला.
हेही वाचा : IND vs NZ 5Th T20: ‘सूर्या’ पुन्हा तळपला! न्यूझीलंडविरुद्ध 63 धावांची तडाखेबंद खेळी
या सामान्यापूर्वी भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंड प्रथम गोलंदाजी करण्यास आमंत्रित केले. भारताकडून इशान किशनने ४२ चेंडूत १०३ धावा केल्या, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत ६३ धावा करून महत्वपूर्ण योगदान दिले. तसेच हार्दिक पंड्याने १७ चेंडूत ४२ धावांची स्फोटक खेळी करून संघाची धावसंख्या २७० पोहचवण्यास मोठी मदत केली आणि न्यूझीलंडसमोर २७२ धावांचे लक्ष्य उभे केले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर जेकब डफी, काइल जेमिसन आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
हेही वाचा : IND vs NZ 5Th 20I : तिरुवनंतपुरममध्ये इशान किशनचा शतकी तडाखा! न्यूझीलंडची गोलंदाजी लाईनअप केली उद्ध्वस्त
धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या किवी संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाची पहिली विकेट टिम सेफर्टच्या रूपाने १७ धावांवरच गेली. त्यानंतर मात्र फिन ॲलन आणि रचिन रवींद्र यांनी १०० धावांची भागीदारी रचली. या वेळी वाटत होते होते की, किवी संघ हा सामना सहज जिंकेल. परंतु, रचीन रवींद्र ३० धावा करून बाद झाला. त्यानंतरही फिन ॲलन चौफेर फटकेबाजी करत होता. परंतु तो ८० धावा करून बाद झाला. त्याने ३८ चेंडूत ८० धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ८ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याला अक्षर पटेलने बाद केले. त्यानंतर न्यूझीलंड संघातील कुणालाच मोठी खेळी करता आली नाही. ग्लेन फिलिप्स ७ धावा, डॅरिल मिशेल २६ धावा, बेवन जेकब्स ७ धावा, मिचेल सँटनर ० धावा, काइल जेमिसन ९ धावा, ईश सोढी ३३ धावा, लॉकी फर्ग्युसन ३ धावा करून बाद झाले तर जेकब डफी ९ धावा करून नाबाद राहिला. परिणामी न्यूझीलंड संघ १९.४ षटकात २२५ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने ४६ धावांनी विजय मिळवला. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने ३ विकेट्स घेतल्या. तसेच वरुण चक्रवर्ती आणि रिंकू सिंग यांनी पत्येकी १ विकेट घेतली.
5th T20I. India Won by 46 Run(s) https://t.co/AwZfWUTBGi #TeamIndia #INDvNZ #5thT20I @IDFCfirstbank — BCCI (@BCCI) January 31, 2026
भारत प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, बेवन जेकब्स, मिचेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी






