पंतप्रधान मोदींनी केले सुनेत्रा पवारांचे अभिनंदन (फोटो- सोशल मीडिया)
पंतप्रधान मोदींनी पवारांना दिलेल्या शुभेच्छा
सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
आज महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. आज राजभवन येथे शपथविधी कार्यक्रम पार पडला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याआधी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये पक्षाचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहेत. पक्षाच्या गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. व्हीप बाजवण्याचा अधिकार देखील आता सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहे. सुनेत्रा पवार आता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या मुख्य नेत्या असणार आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीट काय?
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवारजी यांना शुभेच्छा.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील.@SunetraA_Pawar — Narendra Modi (@narendramodi) January 31, 2026
मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील.
सुनेत्रा पवार DCM होताच राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल
बारामती येथे विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे संपूर्ण राज्य शोकमय झाले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेतृत्व आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची देखील शपथ घेतली आहे. यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.
Maharashtra Politics: “पाटील असावा पण पटेल…”; सुनेत्रा पवार DCM होताच राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल
राज ठाकरे यांची पोस्ट काय?
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !






