Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तातील घाण कोलेस्ट्रॉलमुळे बंद झालेल्या नसा पुन्हा खुल्या करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. यामुळे हृदयविकार आणि रक्तवाहिन्यांसंबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरात वाढलेल्या खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, जाणून घेऊया . हे पदार्थ खाल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि शरीराला हानी पोहचत नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 09, 2024 | 05:30 AM
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन

शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन

Follow Us
Close
Follow Us:

धावपळीच्या जीवनात सतत खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होत असतात. नेहमी बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे आरोग्य बिघण्याची शक्यता असते. जास्त तेलकट पदार्थ खाल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल विषासमान आहे. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर रक्तवाहिन्यासंबंधित आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यानंतर पिवळ्या रंगाचा चिकट थर तयार होतो. हा थर तयार झाल्यानंतर रक्तवाहिन्या बंद होऊन जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रक्तवाहिन्यांमधील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे पदार्थ खाल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील.(फोटो सौजन्य-istock)

शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन:

शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन

ओट्स:

ओट्स मध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. त्यामुळे तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या जेवणात सुद्धा ओट्स खाऊ शकता. ओट्स शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल खेचून घेण्याचे काम करतात. तसेच यामध्ये असलेल्या बीटा-ग्लुकान या घटकामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. कोलेस्ट्रॉल कमी झाल्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो.

हे देखील वाचा: सतत अंजीर खाणे ‘या’ व्यक्तींसाठी ठरेल घातक, उद्भवतील आरोग्यासंबंधित गंभीर समस्या

शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन

भेंडी:

आपल्यातील अनेकांना भेंडीची भाजी खायला आवडत नाही. पण भेंडीच्या भाजीमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. यामध्ये असलेले फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉल खेचून घेते, ज्यामुळे बंद झालेल्या रक्तवाहिन्या खुल्या होतात. भेंडीची भाजी खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश करा.

शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन

जवस:

जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी असिड आढळून येते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. शरीरात वाढलेली खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर एक चमचा जवसाच्या बियांचे सेवन करावे. जवसाच्या बियांमध्ये फायबर सुद्धा असते. या बियांचे नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

हे देखील वाचा: विटामीन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त ‘या’ फळांचे करा सेवन

शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन

सूर्यफुलाच्या बिया:

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सूर्यफुलाच्या बिया आवडतात. सुर्यफूलच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी असिड आढळून येते, ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन आरोग्य सुधारते. सूर्यफुलाच्या बियांचे नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Eating these foods to remove bad cholesterol from the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • home remedies

संबंधित बातम्या

गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित खा ‘ही’ फळे, शरीर राहील फ्रेश आणि तंदुरुस्त
1

गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित खा ‘ही’ फळे, शरीर राहील फ्रेश आणि तंदुरुस्त

रेबीज इंजेक्शन देण्यात ‘शताब्दी’ रुग्णालय अव्वल! वर्षभरात २३,७३६ रेबीज लसीकरण; इतर रुग्णालयांकडूनही रुग्णांची होते पाठवणी
2

रेबीज इंजेक्शन देण्यात ‘शताब्दी’ रुग्णालय अव्वल! वर्षभरात २३,७३६ रेबीज लसीकरण; इतर रुग्णालयांकडूनही रुग्णांची होते पाठवणी

लघवी करताना कायमच जळजळ होते? लघवीच्या रंगावरून ओळखा गंभीर आजारांचे संकेत, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे
3

लघवी करताना कायमच जळजळ होते? लघवीच्या रंगावरून ओळखा गंभीर आजारांचे संकेत, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे

महागड्या- केमिकल युक्त कंडिशनरचा वापर करण्याऐवजी १० रुपयांमध्ये घरीच बनवा नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम
4

महागड्या- केमिकल युक्त कंडिशनरचा वापर करण्याऐवजी १० रुपयांमध्ये घरीच बनवा नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.