शरीरात विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे रोजच्या आहारात शरीराला आवश्यक असलेल्या पोषण युक्त पदार्थांचे सेवन करावे. शरीरात विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडे दुखणे, अशक्तपणा जाणवणे, सतत आजारी पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक लोक सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात जातात. पण काहीवेळा कामामुळे कुठे जाता येत नाही. अशावेळी तुम्ही फळांचे सेवन करून शरीरात निर्माण झालेली विटामिन डी ची कमतरता भरून काढून शकता. चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ती फळे.(फोटो सौजन्य-istock)
विटामिन डी ची कमतरता भरून काढतात 'ही' फळे
रोजच्या रोज पपई खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. त्या बरोबरच विटामिनची कमतरता सुद्धा दूर होते. पपईमध्ये विटामिन डी मोठ्या प्रमाणावर असते.
चवीला आंबट पण आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असलेले फळ म्हणजे अननस. अननस खाल्यामुळे शरीरातील विटामिन डी ची कमतरता दूर होण्यास मदत होते.
स्ट्रॉबेरीमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन डी आढळून येते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं स्ट्रॉबेरी खायला खूप आवडते. आंबट गोड चवीच्या स्ट्रॉबेरीमध्ये अनेक गुणकारी घटक आहेत.
नैसर्गिक गोडवा असलेले अंजीर सगळ्यांचं आवडतात. हाडांच्या मजबूत आरोग्यसाठी नियमित अंजीर खावे.
सफरचंदामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन डी आढळून येते. अनेकदा डॉक्टरसुद्धा नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे रोजच्या आहारात एक सफरचंद खावे.