नैसर्गिक गोडवा असलेले अंजीर सगळ्यांचं खायला आवडतात. काहींना ओले अंजीर आवडतात तर काहींना सुकवलेले अंजीर आवडतात. बाजारात सुकवल्ली अंजीर सहज उपलब्ध होतात. नियमित एक अंजीर खाल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते. अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणावर मिनरल्स आणि विटामिन्स आढळून येतात, ज्याचा शरीराला फायदा होतो. अंजीर खाल्यामुळे आरोग्य सुदृढ राहते. तसेच शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी अंजीर खावे. मात्र काहींच्या आरोग्यासाठी अंजीर खाणे घातक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तींनी अंजीरचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
सतत अंजीर खाणे 'या' व्यक्तींसाठी ठरेल घातक
चवीला गोड असलेले अंजीर खायला सगळ्यांचं आवडते. मात्र काहींच्या आरोग्यासाठी अंजीर धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात अंजीरचे सेवन करावे.
किडनी स्टोन किंवा किडनीसंबंधित इतर समस्या असलेल्या रुग्णांनी अंजीर खाऊ नयेत. अंजीर चिकट असल्यामुळे आतड्याना तसेच चिटकून राहतात. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास असलेल्यांनी अंजीर खाऊ नये.
शुगरचा त्रास असलेल्या रुग्णांनी चुकूनही अंजीर खाऊ नये. अन्यथा रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागेल. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.
पोट दुखी, अपचन किंवा गॅसचा त्रास होत असल्यास अंजीर खाऊ नये. कारण सुकवलेले अंजीर पचनास जड जातात. ज्यामुळे पोट फुगणे किंवा पोट दुखीचा त्रास उद्भवतो.
ज्यांना त्वचेसंबंधित कोणत्याही समस्या असतील अशांनी अंजीरचे सेवन करू नये. अंजीर खाल्यामुळे या समस्या आणखीन वाढण्याची शक्यता असते.