
सतत गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते? मग नैसर्गिक गोडवा असलेले 'हे' पदार्थ खाल्ल्यास वजन राहील नियंत्रणात, क्रेविंग होईल पूर्ण
साखर खाण्याची इच्छा का होते?
साखर खाल्ल्यास शरीरावर होणारे दुष्परिणाम?
साखरेऐवजी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे?
वाढलेले वजन, मधुमेह, हृदयविकार, वाढलेले कोलेस्ट्रॉल इत्यादी शरीरसंबंधित गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. पण तरीसुद्धा फारसा बदल शरीरात दिसून येत नाही. आपल्यातील अनेकांना कायमच गोड, तिखट, चटपटीत आणि रोजच्या आहारात विकतचे पदार्थ खाण्याची खूप जास्त सवय असते. याच चुकीच्या सवयीचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. वारंवार गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर मिठाई किंवा साखरेपासून बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे अतिशय आवडीने सेवन केले जाते. मात्र हेच पदार्थ शरीर आतून पोखरून अशक्त करून टाकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर कोणत्या नैसर्गिक गोडवा असलेल्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहण्यासोबतच मधुमेह सुद्धा नियंत्रणात राहील.(फोटो सौजन्य – istock)
दैनंदिन आहारात नियमित एक फळ खाण्याचा सल्ला डॉक्टर कायमच देत असतात. ताज्या फळांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे नियमित एक तरी फळ खावे. सफरचंद, पेरू, केळी इत्यादी फळांमध्ये असलेला नैसर्गिक गोडवा झपाट्याने रक्तातील साखर वाढवत नाही आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. शिरा किंवा पॅनकेक बनवताना त्यामध्ये पिकलेली केळी मॅश करून टाकावीत. आहारात फायबर युक्त फळांचे सेवन केल्यास पचनक्रिया मजबूत राहते.
सकाळच्या नाश्त्यात नियमित एक किंवा दोन खजूर खावेत. खजूरमध्ये असलेल्या नैसर्गिक गोडव्यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी झपाट्याने वाढत नाही. यामध्ये ६० ते ७०% नैसर्गिक साखर असते. त्यामुळे नियमित १ किंवा २ खजूर आवर्जून खावेत. यामध्ये असलेले लोह, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला तात्काळ ऊर्जा देतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. ड्रायफ्रूट लाडू, एनर्जी बार किंवा खीर बनवताना त्यात पांढऱ्या साखरेचा वापर करण्याऐवजी खजूर वापरावे.
नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले गूळ शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. बऱ्याचदा घरात वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ बनवण्यासाठी साखरेचा वापर करण्याऐवजी गुळाचा वापर करावा. गुळामध्ये लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे नियमित एक ग्लास दुधात अर्धा चमचा गूळ मिक्स करून प्यावे. यामुळे शरीरास आवश्यक असलेले लोह मिळेल. अॅनिमिया किंवा वात दोषाने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात गुळाचा समावेश करावा.
Ans: अपुरी झोप, ताणतणाव, असंतुलित आहार, रक्तातील साखरेतील चढ-उतार किंवा काही पोषणतत्त्वांची कमतरता यामुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छा वारंवार होऊ शकते.
Ans: ताजी फळे, खजूर, मनुका, अंजीर यांसारखे नैसर्गिक गोडवा असलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास गोड खाण्याची इच्छा काही प्रमाणात कमी होऊ शकते.
Ans: बहुतेक लोकांसाठी गोड पदार्थ पूर्णपणे टाळण्याऐवजी मर्यादित प्रमाणात आणि संतुलित आहारासह सेवन करणे अधिक व्यवहार्य ठरते.