Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Update: शहरासह ग्रामीणमध्येही साथ रोगाचे थैमान! टायफाईड, मलेरीया, डेंग्यूचे रूग्ण वाढले; १ हजार आयवी सेटची मागणी

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे ग्रामीण भागात साथीच्या आजारांची रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. डेंग्यू, मलेरिया आणि इतर आजारांमध्ये वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 29, 2026 | 10:45 AM
शहरासह ग्रामीणमध्येही साथ रोगाचे थैमान! टायफाईड, मलेरीया, डेंग्यूचे रूग्ण वाढले; १ हजार आयवी सेटची मागणी

शहरासह ग्रामीणमध्येही साथ रोगाचे थैमान! टायफाईड, मलेरीया, डेंग्यूचे रूग्ण वाढले; १ हजार आयवी सेटची मागणी

Follow Us
Follow Us:

ग्रामीण भागात साथरोगसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मागील महिनाभरात डायरिया (अतिसार), टायफाईड, मलेरिया, डेंग्यू या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. अनेक गावात दूषित पाणी पिण्यासाठी वापरले जाते. यातून जलजन्य आजारांचा फैलाव होत आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर आयव्ही सेटचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णांना गरज असतानाही सलाईन देणे शक्य होत नाही. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने वर्धा येथून १ हजार आयवी सेटची मागणी केली आहे.(फोटो सौजन्य – AI)

जिम ट्रेनर बनायचंय? ही महत्त्वाची कौशल्ये बाणावी लागतील तुमच्या अंगी! पाहून घ्या टिप्स आणि ट्रिक्स

जिल्ह्यात ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ४५५ आरोग्य उपकेंद्रे आहेत. यंदा पावसाने उघडीप दिल्याने साथरोगांचा फैलाव वाढत आहे. त्यातही डायरियाचे रुग्ण गावागावांत दिसू लागले आहेत.उपकेंद्रस्तरावर समुदाय आरोग्य अधिकाऱ्याने सकाळी ८:३० ते दुपारी १२ पर्यंत रुग्ण तपासणी करणे अपेक्षित आहे. त्यानंतर गृहभेटी द्याव्या, असे निर्देश आहेत. मात्र, यावर बहुतांश ठिकाणी काम होत नाही. २१२ उपकेंद्रांतच समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत असून, उर्वरित उपकेंद्रातील जागा रिक्त आहे. यामुळे त्या उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांत संदर्भित आरोग्य सेवा मिळणे कठीण झाले आहे. एएनएम यांच्याकडे प्रामुख्याने लसीकरणाची जबाबदारी दिली आहे.

महिन्यातील दोन हप्ते लसीकरण, तिसऱ्या आठवड्यात अहवाल तयार करणे व शेवटच्या आठवड्यात मुख्यालयी राहणे असा कार्यक्रम आखून दिला आहे. यामुळे ग्रामीण भागात आता आरोग्य सेवेची स्थिती गंभीर बनली आहे.पांढरकवडा शहरातील स्वच्छता व्यवस्था ढासळल्याने येथे डेंग्यु, मलेरीया व डायरीयाचा धोका वाढला आहे. दररोज ५०० ते ६०० रूग्ण उपजिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी येत आहे.

चिकन मटण खाण्याऐवजी आहारात करा ‘या’ प्रोटीनयुक्त फळांचे सेवन, थकवा- अशक्तपणा कमी होऊन राहाल कायमच फिट

वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पांढरकवडा शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. नगर परिषद प्रशासनाकडे तातडीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात तुंबलेले नाले, साचलेले सांडपाणी, रस्त्यांवरील कचऱ्याचे ढिगारे, वाढता डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छ वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया, व्हायरल ताप यांसह हगवण (डायरिया) साथीचा धोका वाढत आहे. असे युवा टायगर फोर्सचे संयोजक अंकित नैताम यांनी सांगितले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सध्या कोणत्या साथीच्या रोगांचे रुग्ण वाढत आहेत?

    Ans: सध्या टायफाईड, मलेरिया आणि डेंग्यू या आजारांचे रुग्ण शहरासह ग्रामीण भागात वाढत असल्याचे दिसून येत आहे.

  • Que: टायफाईड, मलेरिया आणि डेंग्यूची प्रमुख लक्षणे कोणती?

    Ans: सतत ताप येणे, अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ, उलट्या, थंडी वाजणे तसेच डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी होणे ही प्रमुख लक्षणे असू शकतात.

  • Que: या आजारांपासून बचावासाठी काय करावे?

    Ans: स्वच्छ पाणी पिणे, अन्नाची स्वच्छता राखणे, डासांची उत्पत्ती होऊ न देणे, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे आणि डासप्रतिबंधक उपायांचा वापर करणे आवश्यक आहे.

Web Title: Epidemic wreaks havoc in both urban and rural areas cases of typhoid malaria and dengue on the rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • Dengue Virus
  • Health Care Tips
  • Health Updates

संबंधित बातम्या

चिकन मटण खाण्याऐवजी आहारात करा ‘या’ प्रोटीनयुक्त फळांचे सेवन, थकवा- अशक्तपणा कमी होऊन राहाल कायमच फिट
1

चिकन मटण खाण्याऐवजी आहारात करा ‘या’ प्रोटीनयुक्त फळांचे सेवन, थकवा- अशक्तपणा कमी होऊन राहाल कायमच फिट

पावसाळ्यात केवळ पाणी पिणे पुरेसे का नसते? शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्सही महत्त्वाचे, जाणून घ्या सविस्तर
2

पावसाळ्यात केवळ पाणी पिणे पुरेसे का नसते? शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्सही महत्त्वाचे, जाणून घ्या सविस्तर

Monsoon Care Tips: पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका ‘या’ भाज्या, आतड्यांना छिद्र पडून पोटाचे होईल गंभीर नुकसान
3

Monsoon Care Tips: पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका ‘या’ भाज्या, आतड्यांना छिद्र पडून पोटाचे होईल गंभीर नुकसान

Health Update: वातावरणातील बदलांचा थेट झोपेवरच हल्ला! जगभरात वर्षाला ५६ तास झोप गायब; भारतात स्थिती अधिक गंभीर
4

Health Update: वातावरणातील बदलांचा थेट झोपेवरच हल्ला! जगभरात वर्षाला ५६ तास झोप गायब; भारतात स्थिती अधिक गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.