वाईचा प्रसिद्ध ढोल्या गणपती! कधी झाली स्थापना, जाणून घ्या सविस्तर इतिहास
Dholya Ganpati History: वाई हे एक प्राचीन शहर आहे. महाभारताच्या काळात ते ‘विराट नगरी’ म्हणून ओळखले जात असे कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या असंख्य मंदिरांमुळे या शहराला ‘मंदिरांचे शहर’ म्हणूनही ओळखले जाते. वाईमध्ये कृष्णा नदीच्या काठावर सात घाट आहेत, ज्यामुळे या शहराला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide
इथेच वसले आहे महागणपती मंदिर किंवा ढोल्या गणपती मंदिर. महागणपती मंदिर वाईमधील गणपती आळी घाटावर वसलेले आहे. या मंदिराच्या समोर काशी विश्वेश्वर मंदिर आहे. गणपतीची ही विशाल मूर्ती एकाच काळ्या पाषाणातून कोरलेली आहे, ज्या पाषाणातून काशी विश्वेश्वर मंदिरातील नंदीची मूर्ती बनवली आहे. हे मंदिर १७६२ मध्ये श्री गणपतीराव भिकाजी रास्ते यांनी बांधले होते असे सांगण्यात येते. वैशाख शुक्ल पक्ष त्रयोदशी १६९१ अर्थात १७६९ मध्ये या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हे भव्य मंदिर निर्माण कऱण्यासाठी साधारण १० वर्ष लागले होते आणि याशिवाय १५ लाख रुपयांचा खर्चही झाला होता असं सांगण्यात येतं.
कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरांपैकी, वाईमधील सर्वात लोकप्रिय मंदिर म्हणजे ढोल्या गणपती मंदिर. ही मूर्ती १० फूट उंच आणि ८ फूट रुंद आहे. मराठीत ‘ढोल्या’ म्हणजे प्रचंड किंवा जाड, म्हणूनच याला ‘ढोल्या’ म्हटले जाते. गणेशाची मूर्ती बसलेल्या स्थितीत असून ती अत्यंत आनंदी आणि सकारात्मक दिसते. दरम्यान ही मूर्ती लहान होत आहे असाही समज दिसून येत आहे.
Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास
या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या मागील बाजूस असलेला ‘माशासारखा’ आकार. कृष्णा नदीच्या पुरापासून मंदिराचे संरक्षण करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. मंदिराच्या मागील बाजूस असलेला माशासारखा आकार पाण्याचा प्रवाह विभागून मंदिरावरील दाब कमी करतो, ज्यामुळे मंदिर पुरापासून सुरक्षित राहते. वाईमधील अनेक स्थानिकांचा ठाम विश्वास आहे की या मंदिरात केलेली कोणतीही इच्छा किंवा प्रार्थना अर्थात नवस केला असेल तो हमखास पूर्ण होतो. तुम्ही वाईला गेलात तर इथे नक्की भेट द्या.






