Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भुवयांचे केस गळून पातळ झाले आहेत? मग नॅचरली आयब्रो आणि काळे करण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

भुवयांवरील केस पातळ होण्यास अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. थायरॉईड, पोषक तत्त्वांची कमतरता, हार्मोन्समधील बदल, ताणतणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा दिसून येतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 28, 2026 | 08:07 AM
भुवयांचे केस गळून पातळ झाले आहेत? मग नॅचरली आयब्रो आणि काळे करण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय

भुवयांचे केस गळून पातळ झाले आहेत? मग नॅचरली आयब्रो आणि काळे करण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

त्वचेच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. स्किन केअर, हेअर केअर तर काहीवेळा त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी महागड्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. मेकअप केल्यानंतर चेहरा अधिक उठावदार आणि सुंदर दिसवा म्हणून आयब्रो थोडे डार्क केले जातात. भुवया डोळ्यांचे धूळ, घाम आणि कचऱ्यापासून रक्षण करतात. पण बऱ्याचदा आरोग्यासंबंधित गंभीर समस्यांमुळे भुवयांचे केस पातळ होतात, गळून जातात इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. नियमित १ ते २ केस गळणे अतिशय सामान्य आहे. पण भुवयांचे केस वेगाने विरळ होणे, ठिकठिकाणी चट्टे पडणे किंवा केसांची घनता कमी होणे इत्यादी समस्या शरीराअंतर्गत समस्यांमुळे सुद्धा उद्भवण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

अंगाला सतत खाज किंवा पुरळ येते? पावसाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पाण्यात टाका ‘हे’ पदार्थ

थायरॉईड, पोषक तत्त्वांची कमतरता, हार्मोन्समधील बदल, ताणतणाव किंवा ऑटोइम्यून आजार झाल्यानंतर भुवयांवरील केस गळण्यास सुरुवात होते. वारंवार थ्रेडिंग, वॅक्सिंग आणि चुकीच्या घरगुती उपायांमुळे सुद्धा भुवया विरळ होऊन जातात. एरंडेल तेल, खोबरेल तेल यांसारखे उपाय करून भुवयांवरील केस वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. पण भुवयांवरील केस खूप जास्त विरळ झाल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया भुवयांचे केस विरळ कशामुळे होतात आणि भुवयांवरील केस वाढवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत.

भुवया विरळ होण्याची मुख्य कारणे:

वारंवार थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा प्लकिंग केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. वारंवार वॅक्सिंग केल्यामुळे नवीन केस वाढत नाहीत. लोह, विटामिन डी, विटामिन बी १२, झिंक, बायोटिन आणि प्रथिनांची कमतरता निर्माण झाल्यानंतर भुवयांचे केस खूप जास्त गळतात. थायरॉईडची समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये भुवयांचा बाहेरील एक-तृतीयांश भाग पातळ होऊन जातो. गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीच्या दिवसांमध्ये महिलांचे केस खूप जास्त गळतात. याशिवाय मानसिक तणाव वाढल्यामुळे किंवा ॲलोपेशिया अरेटा इत्यादी गंभीर समस्यांमुळे भुवयांवरील केस गळून जातात.

भुवया विरळ झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • भुवयांवरील केस अचानक गळून जाणे
  • लालसरपणा, तीव्र खाज
  • केसगळतीसोबत अत्यंत थकवा जाणवणे
  • अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे
  • मासिक पाळीत अनियमितता
  • खूप थंडी वाजणे
  • रक्तातील थायरॉईड
वाढत्या वयात चेहरा दिसेल तरुण! चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, सुरकुत्या होतील चमक

भुवयांवरील केस वाढवण्यासाठी काय करावे:

एरंडेल तेलामध्ये रिसिनोलिक ॲसिड, विटामिन ई आणि फॉलिक ॲसिड असते. केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी रात्री झोपण्याआधी एरंडेल तेल भुवयांवर लावावे. रात्रभर तसेच ठेवल्यानंतर भुवया पाण्याने स्वच्छ धुवून टाका. याशिवाय भुवयांची घनता वाढवण्यासाठी कोरफड जेल लावावे. यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी होण्यासोबतच भुवयांचे केस घनदाट होतात. कांद्याच्या रसात सल्फर असते, ज्यामुळे भुवया आणि केसांच्या वाढत्या समस्या कमी होण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Eyebrows becoming thin due to hair fall try these natural home remedies to make your brows thicker and darker

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 08:07 AM

Topics:  

  • health issue
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
1

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल
2

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
3

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
4

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.