Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : भारतातील 3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या

भगवान श्रीकृष्णाशी जोडलेली भारतातील अनेक मंदिरे श्रद्धेसोबतच इतिहास, संस्कृती आणि सुंदर वास्तुकलेसाठीही प्रसिद्ध आहेत. कृष्णभक्तांनी आयुष्यात एकदा तरी या प्रसिद्ध मंदिरांना भेट देण्याचा अनुभव नक्की घ्यावा.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 05, 2026 | 08:13 AM
Travel News : जगातील 3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर... भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या

Travel News : जगातील 3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर... भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या

Follow Us
Follow Us:
  • भक्तीमय वातावरण आणि आसपासच्या गल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे.
  • द्वारकाधीश मंदिर समुद्रकिनाऱ्याजवळील स्थान आणि आकर्षक वास्तुकलेमुळे भाविकांना आकर्षित करते.
  • पुरीचे जगन्नाथ मंदिर रथयात्रा, पारंपरिक संस्कृती आणि प्रसिद्ध महाप्रसादासाठी विशेष ओळखले जाते.
भगवान कृष्णाचे नाव घेताच काहींना वृंदावनाची आठवण येते तर काहींच्या मनात द्वारकेचा समुद्र उभा राहतो, तर काहींना कृष्णजन्माष्टमी निमित्त सजवलेल्या सुंदर मंदिरांची दृष्ये आठवू लागतात. श्रीकृष्णाशी जोडलेेल्या मंदिरांची खासियत ही आहे की इथे धार्मिक वातावरणासह स्थानिक संस्कृतीचाही आनंद लुटता येतो. मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या गल्ल्याा, प्रसादाची दुकाने, फुलांचा सुगंध, भजन आणि भक्तांची गर्दी या सर्वांचा अनुभवच वेगळा असतो. जर तुम्ही कृष्ण भक्त असाल तर देशातील काही लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध कृष्णमंदिरांना तुम्ही एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी. चला या लेखाच्या मदतीने देशातील काही सुंदर आणि अलाैकिक कृष्णमंदिरांची माहिती जाणून घेऊया. इथे तुम्हाला फक्त भक्तीमय वातावरणच पाहायला मिळणार नाही तर वर्षानुवर्षे जुना इतिहास देखील जवळून पाहता येईल.

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी

बांके बिहारी, वृंदावन

उत्तर प्रदेशच्या वृंदावनमधील बांके बिहारी मंदिर कृष्ण भक्तांमध्ये भरपूर लोकप्रिय आहे. इथे भगवान कृष्णाला बांके बिहारीच्या रुपात पूजले जाते. मंदिरातील सर्वात खास गोष्ट म्हणजे इथले भक्तीमय आणि सुखद वातावरण. दर्शनासाठी आलेली लोक भजन, कृष्णाचा जयघोष यांच्यात मग्न झालेली असतात. मंदिराच्या आजूबाजूच्या लहान गल्ल्या वृंदावनातील एक वेगळे जग दाखवून देतात. जर तुम्ही इथे गेलात तर फक्त मंदिराचे दर्शन घेऊ नका तर वृंदावनातील गल्ल्यांमध्ये फिरा, स्थानिक पदार्थांचा आस्वाद घ्या आणि आजूबाजूच्या अन्य धार्मिक स्थळांचीही भेट घ्या.

द्वारकाधीश मंदिर, द्वारका

गुजरातील राज्यातील द्वारका जिल्ह्यात द्वारकाधीश मंदिर आहे जिथे भगवान कृष्णाची राजाच्या रुपात पूजा केली जाते. या ठिकाणाला कृष्णाची नगरी द्वारकेशी जोडले जाते. मंदिराच्या आतील सुबक वास्तुकला आणि समुद्राजवळील त्याचे स्थान या मंदिराला आणखी खास बनवते. भक्त इथे मंदिराच्या दर्शनासह द्वारकेतील इतर धार्मिक स्थळं आणि समुद्रकिनारी असलेल्या ठिकाणांना भेट देणे पसंत करतात. सकाळी आणि संध्याकाळच्या प्रहरी मंदिरातील वातावरण पाहण्याजोगे ठरते.

Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे

जगन्नाथ मंदिर, पुरी

ओडिशातील जगन्नाथ मंदिर हे भगवान श्रीकृष्णाचा अवतार असलेल्या जगन्नाथ देवाला समर्पित आहे. इथली खासियत म्हणजे रथ यात्रा, परंतु इतर दिवशीही मंदिर आणि पुरीतील वातावरण भाविकांना आकर्षित करते. १२ व्या शतकात या मंदिराची बांधणी करण्यात आली होती. येथील मूर्ती धातू किंवा दगडाच्या नसून पवित्र कडुलिंबाच्या लाकडापासून तयार करण्यात आल्या आहेत. मंदिरात तयार होणारा महाप्रसाद भाविकांमध्ये फार लोकप्रिय आहे. इथे गेलात तर त्याचा आस्वाद घ्यायला विसरु नका. तुम्ही इथे मंदिरासोबतच, शहरातील समुद्रकिनारे, खाद्यसंस्कृती आणि पारंपरिक संस्कृतीचा अनुभव घेऊ शकता.

 

Web Title: Famous krishna temples in india vrindavan dwarka puri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 08:10 AM

Topics:  

  • Krishna Janmashtami
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : काशीच्या या शक्तीपीठामध्ये पडले होते माता सतीचे आभूषण! जाणून घ्या विशालाक्षी अद्भुत इतिहास
1

Travel News : काशीच्या या शक्तीपीठामध्ये पडले होते माता सतीचे आभूषण! जाणून घ्या विशालाक्षी अद्भुत इतिहास

ट्रेनमध्ये इमर्जन्सी आल्यास चेन खेचण्याशिवाय आणखी कोणते पर्याय आहेत उपलब्ध? जाणून घ्या सविस्तर
2

ट्रेनमध्ये इमर्जन्सी आल्यास चेन खेचण्याशिवाय आणखी कोणते पर्याय आहेत उपलब्ध? जाणून घ्या सविस्तर

इथे पसरलीये बर्फाची चादर… यंदाच्या हिवाळ्यात शिमला-मनाली सोडा, देशातील या 5 ठिकाणांना द्या भेट
3

इथे पसरलीये बर्फाची चादर… यंदाच्या हिवाळ्यात शिमला-मनाली सोडा, देशातील या 5 ठिकाणांना द्या भेट

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला
4

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.