Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोप पूर्ण झाल्यानंतर सुद्धा थकवा- अशक्तपणा जाणवतोय? असू शकतो लिव्हर आणि हृदयसंबंधित ‘या’ आजारांचा धोका

शरीरात वाढलेल्या थकवा अशक्तपणाकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. चला तर जाणून घेऊया थकवा अशक्तपणा वाढण्याची कारणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 01, 2026 | 01:21 PM
झोप पूर्ण झाल्यानंतर सुद्धा थकवा- अशक्तपणा जाणवतोय? असू शकतो लिव्हर आणि हृदयसंबंधित 'या' आजारांचा धोका

झोप पूर्ण झाल्यानंतर सुद्धा थकवा- अशक्तपणा जाणवतोय? असू शकतो लिव्हर आणि हृदयसंबंधित 'या' आजारांचा धोका

Follow Us
Follow Us:

शरीरात थकवा जाणवण्याची कारणे?
कोणत्या आजारांमुळे अशक्तपणा वाढतो?
थकवा अशक्तपणावर घरगुती उपाय?

जीवनशैलीतील बदलांमुळे थकवा, अशक्तपणा किंवा मानसिक तणाव जाणवणे अतिशय सामान्य आहे. पण वारंवार शरीरात वाढलेल्या थकवा आणि अशक्तपणाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. कामाचा वाढता तणाव, पोषक घटकांची कमतरता, हवामानात सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात सतत थकवा जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. शरीर कायमच फिट आणि निरोगी राहिल्यास उत्साहाने काम करण्याची इच्छा होते, पण अशक्तपणा वाढल्यास काम करण्याची किंवा खाण्यापिण्याची इच्छा होत नाही.(फोटो सौजन्य – istock)

शरीरातील विषारी घटकांमुळे आरोग्य बिघडलं आहे? कोमट पाण्यात मिक्स करून प्या ‘ही’ हिरवी पावडर, बद्धकोष्ठता- अपचनचा त्रास होईल कमी

दिवसभराची शांत झोप घेतल्यानंतर सुद्धा शरीरात थकवा अशक्तपणा जाणवत असेल तर लिव्हर किंवा हृद्यासंबंधित आजाराची लक्षणे असू शकतात. लठ्ठपणा वाढल्यानंतर शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते आणि थोडस काम केल्यानंतर सुद्धा थकल्यासारखे वाटते. शरीरावर वाढलेल्या अनावश्यक चरबीमुळे वेगवेगळ्या अवयवांवर जास्तीचा तणाव येण्याची शक्यता असते. यामुळे लवकर थकवा आणि सुस्ती येते. चला तर जाणून घेऊया कोणत्या आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात खूप जास्त थकवा जाणवतो, याबद्दल सविस्तर माहिती.

या आजारांचा वाढू शकतो गंभीर धोका:

चुकीचा आहार, पोषक घटकांचा अभाव, शारीरिक हालचालींचा अभाव, मानसिक तणाव, अपुरी झोप इत्यादी सवयींमुळे आजार वाढू शकतात. याशिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर आणि हृदयविकार यांसारख्या आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू शकतो. या समस्यांकडे सामान्य दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतू शकते. त्यामुळे वेळीच योग्य उपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे.

वारंवार शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करून घेणे फार आवश्यक आहे. थकव्यासोबतच वजन वाढणे, श्वास लागणे, भूक कमी होणे किंवा शरीरात इतर कोणतेही बदल जाणवत असल्यास अजिबात दुर्लक्ष करू नये. जीवनशैलीत होणारे छोटे मोठे बदल कामावर परिणाम करतात. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

आईच्या दुधाचा पहिला थेंब… आरोग्याचा पाया, आई-बाळ यांच्यातील स्तनपानाचा धागा कायम ठेवण्याचे प्रयत्न

जीवनशैलीत कोणते बदल करावे:

कायमच हेल्दी आणि आनंदी राहण्यासाठी नियमित भरपूर पाणी, पालेभाज्या, फळे, पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. संतुलित आणि सहज पचन होणारा आहार घेतल्यास शरीर कायमच निरोगी राहते. नियमित योगासने, व्यायाम, ध्यान केल्यास मानसिक तणाव कमी होतो. दिवसभरातून एकदा ४० मिनिट चालणे गरजेचे आहे. रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये ३ तासांचे अंतर ठेवल्यास पचनक्रिया निरोगी राहील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुरेशी झोप झाल्यानंतरही थकवा का जाणवतो?

    Ans: पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा जाणवत असल्यास झोपेची गुणवत्ता खराब असणे, ताण-तणाव, अशक्तपणा (अॅनिमिया), थायरॉईडचे विकार, मधुमेह, यकृत (लिव्हर) किंवा हृदयाशी संबंधित काही आजार यांसह अनेक कारणे असू शकतात.

  • Que: लिव्हरच्या आजारांमध्ये कोणती लक्षणे दिसू शकतात?

    Ans: सतत थकवा, भूक न लागणे, मळमळ, पोटाच्या उजव्या बाजूला वेदना, त्वचा किंवा डोळे पिवळे पडणे (कावीळ), गडद रंगाची लघवी आणि पायांमध्ये सूज अशी काही लक्षणे दिसू शकतात.

  • Que: हृदयाच्या आजारांमध्ये थकवा का जाणवतो?

    Ans: हृदय प्रभावीपणे रक्त पंप करू शकत नसल्यास शरीराच्या विविध भागांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे थकवा, अशक्तपणा, श्वास लागणे आणि दैनंदिन कामे करताना दम लागणे अशी लक्षणे जाणवू शकतात.

Web Title: Feeling tired and weak even after a full nights sleep it could indicate a risk of liver and heart related conditions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Fatty Liver
  • Health Care Tips
  • Heart Disease

संबंधित बातम्या

शरीरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, त्वचेवर टिकून राहील हास्य
1

शरीरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, त्वचेवर टिकून राहील हास्य

आईच्या दुधाचा पहिला थेंब… आरोग्याचा पाया, आई-बाळ यांच्यातील स्तनपानाचा धागा कायम ठेवण्याचे प्रयत्न
2

आईच्या दुधाचा पहिला थेंब… आरोग्याचा पाया, आई-बाळ यांच्यातील स्तनपानाचा धागा कायम ठेवण्याचे प्रयत्न

Perfume Side Effects: अतिप्रमाणात परफ्यूम वापरताय? मग सावधान! शरीरावर होऊ शकतात ‘हे’ परिणाम
3

Perfume Side Effects: अतिप्रमाणात परफ्यूम वापरताय? मग सावधान! शरीरावर होऊ शकतात ‘हे’ परिणाम

सतत थकवा आणि श्वास घ्याल त्रास होतोय? क्रॉनिक फटीग सिंड्रोमच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार
4

सतत थकवा आणि श्वास घ्याल त्रास होतोय? क्रॉनिक फटीग सिंड्रोमच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच करा उपचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.