आईच्या दुधाचा पहिला थेंब... आरोग्याचा पाया, आई-बाळ यांच्यातील स्तनपानाचा धागा कायम ठेवण्याचे प्रयत्न
मुंबई: बाळाच्या जन्मानंतरचा पहिला थेंब हा केवळ अन्न नसतो, तर तो प्रतिकारशक्ती, सुरक्षितता आणि मायेचा अमूल्य वारसा असतो. आधुनिक जीवनशैली, वैद्यकीय गुंतागुंत आणि वाढत्या हाय रिस्क – गर्भधारणांमुळे स्तनपानाचे आव्हान वाढत असले तरी आईच्या दुधाचे महत्त्व आजही तितकेच अनन्यसाधारण असल्याचे १ ऑगस्ट या जागतिक स्तनपान दिनी स्पष्ट होत आहे.(फोटो सौजन्य – istock)
सायन येथील मुंबई महापालिकेचे लोकमान्य टिळक सर्वसाधारण म्हणजेच सायन रुग्णालय येथे दरवर्षी सुमारे ८ ते १० हजार प्रसूती होतात. यापैकी जवळपास २ हजार महिला हाय रिस्क गटातील असतात. अशा परिस्थितीतही आई आणि बाळ यांच्यातील स्तनपानाचा धागा कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. नवजात अर्भक विभाग प्रमुख तसेच मानवी दुग्धपेढी प्रमुख डॉ. स्वाती मणेरकर यांच्या मते, अनेक मातांना प्रसूतीनंतर शारीरिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागते. काही वेळा बाळ आयसीयूमध्ये असते, तर काही मातांना वैद्यकीय उपचार सुरू असतात.
अशा वेळी स्तनपान शक्य नाही, असा गैरसमज निर्माण होतो. मात्र योग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि प्रशिक्षण दिल्यास बहुतांश मातांना स्तनपान यशस्वीपणे करता येते. तज्ज्ञांच्या मते, आईच्या दुधामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते, संसर्गाचा धोका कमी होतो आणि आई-बाळातील भावनिक नाते अधिक दृढ होते. त्यामुळे स्तनपान ही केवळ आरोग्याची गरज नसून नवजीवनाला मिळणारी पहिली आणि सर्वात नैसर्गिक भेट आहे हाय रिस्क गटातील मातांना स्तनपानाचे तंत्र, पद्धत आणि बाळापर्यंत ते सुरक्षितपणे पोहोचवण्याबाबत विशेष प्रशिक्षण दिले जाते. तज्ज्ञांच्या मते, योग्य मदत मिळाल्यास हाय रिस्क मातादेखील आपल्या बाळाला आईच्या दुधाचा अमूल्य लाभ देऊ शकतात.
Stomach Flu: वारंवार पोटात इन्फेक्शन होतंय? ‘ही’ कारणे असू शकतात जबाबदार
उच्च रक्तदाब (बीपी) असलेल्या माता
प्रसूतीदरम्यान किवा नंतर रक्तस्त्राव झालेल्या माता
मानसोपचार किंवा विशिष्ट औषधोपचार घेणाऱ्या महिला
अत्यल्प वजन असलेल्या माता
ज्यांची बाळे नवजात अतिदक्षता विभागात दाखल आहेत
इतर वैद्यकीय गुंतागुंत असलेल्या माता






