Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Constipation Remedies: बद्धकोष्ठतेने हैराण असल्यास केवळ फायबर पुरेसे नाही, लॅक्झेटिव्ह्जचा करा वापर; तज्ज्ञांचा सल्ला

आपल्याकडे बद्धकोष्ठतेची समस्या दिवसेनदिवस वाढत चालली आहे. अयोग्य खाणे, वेळेवर न झोपणे यामुळे मलावरोध वाढतोय आणि याबाबत अधिक माहिती आपल्याला तज्ज्ञांनी दिली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 17, 2025 | 07:59 PM
बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी काय महत्त्वाचे (फोटो सौजन्य - iStock)

बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी काय महत्त्वाचे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात वाढतेय बद्धकोष्ठता समस्या
  • काय आहेत उपाय
  • लॅक्झेटिव्ह्स म्हणजे काय 
भारतात बद्धकोष्ठता ज्याला हल्ली मलावरोध असाही शब्द वापरण्यात येतो, हा एक गंभीर आरोग्याचा प्रश्न असून त्यातून आपल्या देशाची सुमारे २२ टक्के लोकसंख्या दररोज प्रभावित होते.  मलावरोधासाठी व्यापकदृष्ट्या स्वीकारलेली कोणतीही व्याख्या नाही परंतु तुम्हाला आठवड्यातून तीन दिवसांपेक्षा कमी वेळा शौचास होत असल्यास, तुमचे शौच कडक आणि जाण्यास कठीण असल्यास तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असू शकतो. 

तुम्हाला बद्धकोष्ठता असल्यास आणि तुम्ही गुगलवर उपचार शोधल्यास सर्वाधिक सामान्य उपचार पुरेसे फायबर खाण्याचे दिसतील. आहारातील फायबर्स आपल्याला फळे, भाज्या, अन्नधान्य, दाणे आणि बिया यांच्यात मिळतात. त्यातून शौच मऊ होते आणि ते सहजपणे शरीरातून निघून जाते. परंतु हे प्रतिबंधात्मक उपचार आहेत, बरे करणारे नाहीत. पुरेशा प्रमाणात फायबर खाणे (प्रौढांमध्ये २८ ते ३५ ग्रॅम) हा तुमच्या आहारातील अत्यावश्यक भाग असला पाहिजे. परंतु तुम्हाला बद्धकोष्ठता आधीच असल्यास त्याचा फायदा होणार नाही.  डॉ. हर्षद खैरनार, सल्लागार- गॅस्ट्रोएंटेरॉलॉजी आणि हेपाटोबायलरी सेवा, फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी, नवी मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

5 दिवसात बद्धकोष्ठता होईल नष्ट, 6 फळं आतड्यांतून काढतील सडलेला शौच; डॉक्टरांनी सांगितली खाण्याची पद्धत

केवळ फायबर उपयोगी नाही 

या परिस्थितीत लॅक्झेटिव्ह्सचा फायदा होतो. लॅक्झेटिव्ह्स थेट तुमच्या आतड्यांवर काम करून नैसर्गिक शौच होण्यास मदत करतात. फायबरवर अवलंबून न राहता लॅक्झेटिव्ह्स मुळापासून समस्येवर काम करतात, निश्चित आणि सुलभ दिलासा देतात. अनेक लॅक्झेटिव्ह्जचे सेवन आदल्या रात्री केले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तुमचे शौच सहजपणे काढून टाकतात. 

बद्धकोष्ठता बरा करणारा हा सर्वांत वेगवान आणि सुरक्षित उपचार आहे. तुमचे शरीर नियमित शौचाद्वारे शरीरातील टाकाऊ घटक टाकून देत नसेल तर त्यामुळे पोट फुगणे, पोट भरलेले वाटणे, अपचन होणे आणि भूक न लागणे अशा गोष्टी होऊ शकतात. तुमचे शौच आतड्यांमध्ये अडकून राहिल्यामुळे शरीराचे वजन वाढवते आणि अशा परिस्थितीत खूप जास्त फायबरचे सेवन केल्याने पोटफुगी आणि अपचनाच्या समस्या वाढू शकतात. फायबर तसेही हळू काम करते, आपल्याला हवे असलेले परिणाम दिसण्यास वेळ लागतो आणि त्यातून शौच पूर्णपणे बाहेर जाईल याची खात्री नसते. तर लॅक्झेटिव्ह्ज थेट आतड्यावर काम करते. त्यामुळे शरीराला आपली नैसर्गिक लय पकडण्यास मदत होते. याचा अर्थ फक्त मलावलोधापासून दिलासा नाही तर अपचन, जडपणा आणि त्यासोबत येणारी पोटफुगी यापासूनही दिलासा मिळतो.  

Constipation: बद्धकोष्ठता आहे की नाही कसे ओळखाल? डॉक्टरांनी सांगितलेली लक्षणे ओळखाच

लॅक्झेटिव्ह्ज म्हणजे काय?

लॅक्झेटिव्ह्स हे बद्धकोष्ठतेच्या समस्येच्या वापरासाठी सुरक्षित असतात, कारण त्यात विद्राव्य फायबर असते. त्यामुळे विष्ठा जमते आणि ते काढून टाकणे सोपे जाते. परंतु कोणतेही लक्झेटिव्ह घेण्यापूर्वी, विशेषतः तुम्ही गर्भवती असाल किंवा एखादे औषध सुरू असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम ठरते. ते एक कारक ठरून तुमच्या मोठ्या आतड्याला अति कार्यरत करू शकतात. त्यामुळे शौचास होते. 

लॅक्झेटिव्हची दुसरी श्रेणी म्हणजे विष्ठा मऊ करणारे. त्यांना इमोलिएंट लॅक्झेटिव्ह्स असेही म्हटले जाते. ते तुमच्या विष्ठेत शोषले जाणारे पाणी व फॅट्स वाढवतात आणि त्याला मऊ बनवतात. अलीकडेच बाजारात उपलब्ध असलेले लॅक्झेटिव्ह्ज सर्वांत सुरक्षित औषधांची श्रेणी आहे. त्यावर अनेक वर्षांचे संशोधन करण्यात आले आहे आणि त्यांचा प्रभाव वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध करण्यात आला आहे. प्रकृतीच्या समस्या असलेल्या किंवा धोक्याच्या श्रेणीत असलेल्यांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यातून लॅक्झेटिव्ह्सचे लाभ सुरक्षितपणे दिले जातात आणि वैयक्तिक गरजांनुरूप असतील याची काळजी घेतली जाते. 

काय आहे उपाय

लॅक्झेटिव्ह्स हा मलावरोधाशी लढण्याचा पहिला पर्याय नाही, कारण भरपूर पाणी पिणे, चालणे किंवा व्यायाम, भरपूर प्रमाणात फायबरचे सेवन आणि जीवनशैलीत बदल हेदेखील लॅक्झेटिव्ह्सपेक्षा जास्त प्राधान्याने वापरले जातात कारण ते लघुकालीन उपाय देतात परंतु दीर्घकालीन पचन आरोग्यासाठी ते परिणाम दाखवायला वेळ घेतात. मलावरोधाच्या अलीकडे वाढणाऱ्या घटनांवर लक्ष देणे गरजेचे आहे. 

विशेषतः विष्ठेच्या स्वरूपात बदल, गुदाशयात रक्तस्त्राव, अनपेक्षित वजनघट, एनोरेक्सिया, अनपेक्षित लोहाची कमतरता, एनिमिया इत्यादी बाबीही दिसून आल्या आहेत आणि यासाठी डॉक्टरांचा सल्ला व कोलोनोस्कोपीची गरज आहे. याच कारणासाठी वेगवान आणि सुरक्षित आराम मिळण्यासाठी लॅक्झेटिव्ह्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण तुम्ही निरोगी सवयी निर्माण करत असताना ते तुम्हाला मलावरोधाचा बचाव करण्यासाठी मदत करतात.

FAQs (संबंधित प्रश्न) 

१. बद्धकोष्ठता म्हणजे काय?

अपुरी आतड्याची हालचाल, पोट साफ न होणे आणि शौचाला कडक होणे म्हणजे बद्धकोष्ठता.

२. दीर्घकालीन बद्धकोष्ठतेचे कारण काय आहे?

दीर्घकालीन बद्धकोष्ठतेचे मुख्य कारण म्हणजे कमी फायबर आणि पाण्याचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, काही औषधे, ताणतणाव आणि काही अंतर्निहित आरोग्य समस्या जसे की इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), हायपोथायरॉईडीझम किंवा मधुमेह. शौचास जाण्याची इच्छा दाबणे आणि जीवनशैलीतील बदलदेखील हे होऊ शकतात.

Web Title: Fiber is not enough for constipation problem know the remedies from experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 07:59 PM

Topics:  

  • constipation
  • constipation home remedies
  • Health Tips

संबंधित बातम्या

सकाळी उठताच पोट फुगल्यासारखं वाटतं? नकळत करताय या 8 मोठ्या चुका; आजपासूनच सुधार आणा नाहीतर महागात पडेल
1

सकाळी उठताच पोट फुगल्यासारखं वाटतं? नकळत करताय या 8 मोठ्या चुका; आजपासूनच सुधार आणा नाहीतर महागात पडेल

थंडीत आखडतात शरीरातील 100 पेक्षा अधिक सांधे, 5 सोपी कामं जे त्रासापासून ठेवतील दूर
2

थंडीत आखडतात शरीरातील 100 पेक्षा अधिक सांधे, 5 सोपी कामं जे त्रासापासून ठेवतील दूर

Screen Time Obesity: मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याला कारणीभूत ठरतोय ‘हा’ डिव्हाईस, पालकांना दिला बालरोगतज्ज्ञांनी इशारा
3

Screen Time Obesity: मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याला कारणीभूत ठरतोय ‘हा’ डिव्हाईस, पालकांना दिला बालरोगतज्ज्ञांनी इशारा

महागडे सुपरफूड विसरा, भाजलेले चणे आणि मनुक्याचे मिश्रण आरोग्यासाठी कोणत्या खजिन्यातून कमी नाही; जाणून घ्या फायदे
4

महागडे सुपरफूड विसरा, भाजलेले चणे आणि मनुक्याचे मिश्रण आरोग्यासाठी कोणत्या खजिन्यातून कमी नाही; जाणून घ्या फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.