
आतड्यांमधील घाण सरकन पडून जाईल बाहेर! सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ करण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन
आतडे स्वच्छ करण्यासाठी उपाय?
उपाशी पोटी कोणते पदार्थ खावेत?
बद्धकोष्ठतेची कारणे आणि उपाय?
जीवनशैलीतील सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक तणाव, पोषक घटकांचा अभाव, जेवणाच्या चुकीच्या वेळा, पाण्याचे कमी सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. अतिप्रमाणात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते आणि शरीरात अनेक बदल दिसून येतात. सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवतात आणि संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे पोटात गॅस होणे, पोट फुगणे, मल घट्ट किंवा सुका होणे इत्यादी तक्रारी वाढून शरीरात सुस्तपणा जाणवतो. त्यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला बद्धकोष्ठता आणि आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी उपाशी पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाणी प्यावे. कोमट पाण्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. कोमट पाणी प्यायल्यामुळे बद्धकोष्ठता कायमची बरी होत नाही, पण शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. याशिवाय फायबर युक्त पदार्थांचे आहारात सेवन करावे. फायबर खाल्ल्यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि मल मऊ होण्यास मदत होईल.
दैनंदिन आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. फळे खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी कीवीचे सेवन करावे. स्मूदी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात किवीचे तुकडे, कमी गोड असलेले दही घालून बारीक पेस्ट करून घ्या. तयार केलेल्या स्मूदीमध्ये आवश्यकता वाटल्यास पाणी मिक्स करावे. नियमित किवी स्मूदी प्यायल्यास पोटाच्या त्रासापासून सुटका मिळते. किवीची स्मूदी प्यायल्यामुळे पोटाचा त्रास कमी होतो आणि आतडे स्वच्छ होतात. किवीमध्ये फायबर आणि ॲक्टिनिडिन युक्त घटक आढळून येतात.
एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा सब्जा टाकून रात्रभर तसेच ठेवा. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी सब्जाचे पाणी प्यायल्यास शरीराला आवश्यक फायबर मिळेल. फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यकज पोषण मिळते. सब्जा बिया खाल्ल्यामुळे पोट स्वच्छ होते आणि आतड्या सक्रिय राहतात. याशिवाय वेगवेगळ्या पदार्थांमध्ये तुम्ही सब्जा मिक्स करून खाऊ शकता.
कर्करोगाविरोधातील लढ्याला नवी दिशा! HNCII च्या देशव्यापी मोहिमेची गोरखपूरमधून सुरुवात
आल्याचे सेवन सेवन केल्यामुळे अपचनाच्या समस्या कमी होण्यास मदत होते. याशिवाय मळमळ कमी करण्यासाठी आणि पोटातील वायू नष्ट करण्यासाठी आल्याचा रस प्यावा. सकाळी उठल्यानंतर गरम आल्याचा चहा प्यायल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. याशिवाय ऍसिडिटी वाढल्यानंतर आल्याचा रस काढून त्यात पाणी मिक्स करून प्यावे. यामुळे उलट्या, मळमळ आणि मायग्रेनच्या त्रासापासून सुटका मिळेल.
Ans: फायबरयुक्त पदार्थ, फळे, भाज्या, ओट्स, संपूर्ण धान्य आणि पुरेसे पाणी यांचा आहारात समावेश केल्याने नियमित शौचास मदत होऊ शकते.
Ans: शरीराची पचनसंस्था आणि आतडी नैसर्गिकरित्या मल बाहेर टाकतात. त्यामुळे ‘आतड्यांमधील घाण वितळवणारे’ किंवा त्वरित डिटॉक्स करणारे पदार्थ आवश्यक आहेत, असे नाही.
Ans: फायबर मलामध्ये पाणी धरून ठेवण्यास आणि त्याचा आकार वाढवण्यास मदत करते. त्यामुळे शौचाची प्रक्रिया सुलभ होऊ शकते.