टोमॅटो फेशिअल करण्याच्या सोप्या स्टेप्स
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम जसा आरोग्यावर दिसून येतो तसाच परिणाम त्वचा आणि केसांवर सुद्धा दिसून येतो. धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींमुळे त्वचा खराब होऊन जाते. त्वचेवरील ओपन पॉर्समध्ये घाण अडकून बसल्यामुळे त्वचा अधिक तेलकट आणि चिकट होऊन जाते. शिवाय अनेकदा यामुळे त्वचेवर सुरकुत्या येणे, पिंपल्स येणे, त्वचा टॅन होणे, त्वचेवर पुरळ येणं इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. यामुळे त्वचेची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. त्वचेवर पिंपल्स किंवा फोड आल्यानंतर महिला फेशिअल, क्लीनप इत्यादी अनेक गोष्टी करतात. मात्र काहीकाळ त्वचा सुंदर दिसते आणि त्वचेवरील टॅन कमी होतो. मात्र कालांतराने पुन्हा एकदा त्वचा अधिक तेलकट आणि चिकट होऊन जाते. अशावेळी घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेवरील समस्यांपासून आराम मिळवावा.(फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी त्वचेला आतून पोषण देणे आवश्यक आहे. यासाठी भरपूर पाणी पिणे, आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करणे, पौष्टिक पदार्थ खाणे, त्वचेची योग्य ती काळजी घेणे इत्यादी गोष्टी केल्यास त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होईल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या स्टेप्स वापरून चेहऱ्यावर टोमॅटो फेशिअल कसे करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
टोमॅटोचा वापर त्वचेवर केल्यामुळे त्वचेचा काळवंडलेला रंग उजळण्यासाठी मदत होते. शिवाय यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. टोमॅटोमध्ये विटामिन सी, विटामिन ई, बीटा कॅरोटीन आणि लायकोपीन इत्यादी प्रभावी घटक आढळून येतात. शिवाय टोमॅटो हे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे, ज्यामुळे त्वचेवरील घाण स्वच्छ होऊन त्वचा अधिक सुंदर दिसते. टोमॅटोचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचेवर लालसरपणा येऊन त्वचा सुंदर दिसते.
फेशिअल करताना सर्वप्रथम त्वचा क्लिंजिंग करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेवरील घाण स्वच्छ होते. त्वचा क्लिंजिंग करताना टोमॅटोची पेस्ट करून त्यात थोडंसं मध मिक्स करून पेस्ट तयार करून त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होईल आणि त्वचा अधिक सुंदर दिसण्यास मदत होईल.
टोमॅटोच्या पेस्टमध्ये तांदळाचे पीठ टाकून मिश्रण तयार करून घ्या. नंतर तयार करून घेतलेले मिश्रण त्वचेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. नंतर हलक्या हाताने मसाज करून त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय केल्यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जाऊन त्वचा अधिक सुंदर होईल.
टोमॅटोच्या रसात कच्चे दूध टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर हलक्या हाताने त्वचा हळुवार हाताने मसाज करून घ्या. यामुळे त्वचेचे रक्तभिसरण सुधारेल.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
टोमॅटो पेस्ट तयार करून त्यात दूध आणि कॉफी पावडर मिक्स करून चेहऱ्यावर फेसपॅक लावा. यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होईल.