फोटो सौजन्य - Social Media
जिमचे वेड एक वेगळ्या प्रकारचा क्रेझ असतो. साधारपणे प्रत्येक व्यक्ती त्याच्या तरुणपणात या अनुभवातून नक्कीच गेला असेल. आजकालच्या युवकांमध्ये हा वेड काही जास्तच प्रमाणात दिसून येते. व्यायामाचे वेड असणे कधीही चांगलेच असते, पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असणे फार महत्त्वाचे असते. मर्यादेच्या बाहेर केलेले व्यायाम शरीराला तंदरुस्ती नाही तर कधीही त्रासच देणार आहेत. जिम जॉईन करण्याच्या सुरुवातीच्या दिवसात शरीराला व्यायामाची सवय नसल्याने शरीरातील मांसपेशींना वेदनांचा सामना करावा लागतो.
सुरवातीच्या काही दिवसात या वेदना मोठ्या प्रमाणात जाणवत असतात. यानंतरही त्या जाणवतात कारण मसल्स फाटतील तेव्हाच मसल्समध्ये वाढ होईल. मसल्स फाटण्याच्या या प्रक्रियेमुळे शरीराला वेदना जाणवतात. काही दिवसांनंतर या वेदनांची सवय झाल्यामुळे तो त्रास कमी होतो किंवा जरी होत असला तरी सवयीमुळे ते इतके जाणवत नाही. तरी या वेदना काही गोष्टींना नियमित आत्मसात केल्याने कमी करता येतात.
जिम मधून व्यायाम करून आल्यानंतर मसल्स स्ट्रेचिंग फार महत्वाचे असते. स्ट्रेचिंग केल्याने मसल्सवरील प्रेशर काही प्रमाणात कमी होते आणि वेदनांपासून बऱ्यापैकी आराम मिळतो. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या मांसपेशी आकुंचन पावतात स्ट्रेचिंग केल्याने त्या त्यांच्या मूळ स्वरूपात येतात. त्यामुळे व्यायामानंतर १० ते १५ मिनिटे स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर शरीराला गरम ठेवल्याने या वेदनांपासून आराम मिळतो. त्यासाठी जिम मधून आल्यावर किमान २० मिनिटाने गरम पाण्याने अंघोळ करावी. याने मांसपेशींना शेक मिळते तसेच रक्तप्रवाह वाढतो. याशिवाय शरीराला हॉट पॅकने शेकसुद्धा देऊ शकता.
नियमित व्यायाम करणाऱ्या शरीराला जास्त पाण्याची गरज असते. व्यायाम करताना शरीरातील पाणी मोठ्या प्रमाणात घामाच्या स्वरूपात शरीरातून बाहेर निघतं. यामुळे जितके होऊ शकले तितके जास्त पाणी पिणे कधीही उत्तम असते. त्याचबरोबर नियमित व्यायाम करणाऱ्या शरीराने मालिश करून घ्यावीच. याने वेदना तर दूर होतातच त्याचबरोबर मसल्सला मुबलक प्रमाणात ऑक्सिजनही मिळते तसेच रक्तप्रवाहही वाढतो.