Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Cravings: सतत काहीतरी खावंस वाटतंय? हा आजार की पोषक तत्त्वांच्या कमतरतेचा इशारा? जाणून घ्या

Food Craving Causes: वारंवार गोड, खारट, चॉकलेट किंवा जंक फूड खाण्याची तीव्र इच्छा होणे ही सवय सामान्य नाही. यामागची कारणे कोणती, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 05, 2026 | 06:41 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • सतत काहीतरी खावंस वाटतंय?
  • हा आजार की पोषक तत्त्वांच्या कमतरतेचा इशारा?
  • फूड क्रेविंग कमी करण्यासाठी काय करावे?
अनेकांना अचानक गोड, खारट, चॉकलेट किंवा जंक फूड खाण्याची तीव्र इच्छा होचते. बहुतेक वेळा यामागे केवळ चवीची आवड किंवा सवय कारणीभूत असते. मात्र, काही प्रकरणांमध्ये वारंवार होणारी फूड क्रेविंग ही शरीरातील विशिष्ट पोषक घटकांची कमतरता, झोपेचा अभाव, ताणतणाव, हार्मोनल बदल किंवा आहारातील असंतुलन यांचे संकेतही असू शकतात. त्यामुळे अशा इच्छेकडे दुर्लक्ष न करता त्यामागील कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक फूड क्रेविंगचा अर्थ पोषक घटकांची कमतरता असा नसला तरी ती सतत होत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

ऑफिस आणि मॉलमधील हँड ड्रायर वापरताय? जाणून घ्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

गोड पदार्थ खाण्याची इच्छा का होते?

वारंवार गोड खावेसे वाटणे हे शरीरात ऊर्जेची कमतरता, पुरेसे अन्न न घेणे, अपुरी झोप किंवा मानसिक ताण यांच्याशी संबंधित असू शकते. काही संशोधनांमध्ये मॅग्नेशियमच्या कमतरतेचा आणि गोड किंवा चॉकलेट खाण्याच्या इच्छेचा संबंध नमूद करण्यात आला आहे. मात्र, प्रत्येक वेळी ही कमतरताच कारणीभूत असते असे मानता येत नाही.

खारट पदार्थांची क्रेव्हिंग

जर वारंवार चिप्स किंवा खारट पदार्थ खावेसे वाटत असतील, तर अतिप्रमाणात घाम येणे, शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) किंवा इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन ही संभाव्य कारणे असू शकतात. काही लोकांमध्ये ही केवळ चवीची सवयही असू शकते.

चॉकलेटची इच्छा

चॉकलेट खाण्याची इच्छा अनेकदा ताणतणाव, थकवा किंवा मूडमधील बदलांशी जोडली जाते. काही अभ्यासांमध्ये याचा संबंध मॅग्नेशियमच्या कमतरतेशी असला तरी हे पूर्पपणे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून आहे.

बर्फ चावून खावेसे वाटणे

वारंवार बर्फ चघळण्याची इच्छा होत असल्यास ती लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अॅनिमियाचे लक्षण असू शकते. अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

जंक फूडची क्रेव्हिंग

तळलेले पदार्थ किंवा जंक फूड खाण्याची इच्छा वाढण्यामागे ताणतणाव, झोपेची कमतरता आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे नियमित सेवन ही प्रमुख कारणे असू शकतात. यामागे नेहमीच एखाद्या पोषक घटकाची कमतरता असते असे नाही.

फूड क्रेविंग कमी करण्यासाठी काय करावे?

  • संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.
  • दिवसभर पुरेसे पाणी प्या.
  • दररोज रात्री ७ ते ८ तासांची शांत आणि गाढ झोप घ्या.
  • आहारात प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
  • नियमित व्यायाम, योगा किंवा ध्यानाद्वारे ताण कमी ठेवा.
  • एखाद्या विशिष्ट पदार्थाची क्रेविंग दीर्घकाळ कायम राहिल्यास डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Health Tips: हेल्दी स्नॅक्स खाऊनही पोट सुटलंय? ‘या’ सवयींमुळे वाढू शकते वजन

Web Title: Food craving causes health tips nutrition deficiency signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • Bad Quality Food
  • food
  • health care news
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
1

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

Jeera Water: वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी खरंच उपयोगी? रोज पिण्याआधी जाणून घ्या फायदे-तोटे
2

Jeera Water: वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी खरंच उपयोगी? रोज पिण्याआधी जाणून घ्या फायदे-तोटे

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
3

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

HPV Vaccination: HPV लसीकरणासाठी योग्य वय का महत्त्वाचे आहे? तज्ज्ञांचा सल्ला
4

HPV Vaccination: HPV लसीकरणासाठी योग्य वय का महत्त्वाचे आहे? तज्ज्ञांचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.