सध्या नवरात्रीचे दिवस सुरु आहेत. यंदा 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीच्या उत्सवाला सुरवात झाली आहे. या सणानिमित्त अनेकजण देवीची मनोभावनेने पूजा-अर्चा करत उपवास करत असतात. नवरात्रीचा उपवास काही सोपा नव्हे, हा उपवास अवघे नऊ दिवस केला जातो. अशात नवरात्रीच्या नऊ दिवसांत आपण तेच तेच खाऊन कंटाळला असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी लाइफ सेव्हर ठरणार आहे.
उपवास म्हटलं की, तेच तेच निवडक पदार्थ आठवू लागतात. मात्र तुम्ही या उपवासाच्या पदार्थांपासून अनेक वेगवगेळे पदार्थदेखील बनवू शकता. आज आम्ही तुमच्यासोबत उपवासाची एक चवदार रेसिपी शेअर करत आहोत. या रेसिपीचे नाव आहे साबुदाणा कटोरी चाट. चटपटीत आणि कुरकुरीत अशी ही चाट घरातील सर्वांनाच फार आवडेल. आजची ही हटके रेसिपी @chefguntas नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आली आहे. जाणून घेऊयात ही उपवासाची चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Navratri Recipe: उपवासात काही खास खायचे आहे? मग चविष्ट साबुदाणा चीला बनवून पहा
हेदेखील वाचा – Navratri Special : झटपट बनवा जाळीदार आणि मऊ उपवासाची इडली-चटणी