छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील अंतर्गत वाद उघड झाला आहे. गुलमंडी प्रभागातून उमेदवारी मिळवण्यासाठी आमदार प्रदीप जैस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. जैस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश आणि तनवाणी यांचा मुलगा चंद्रकांत या दोघांनाही खुल्या पुरुष प्रवर्गातून तिकीट हवे असल्याने पक्षांतर्गत धुसफूस वाढली आहे. या ‘पुत्रसंघर्षा’मुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.














