पंतप्रधान मोदी आजपासून परदेश दौऱ्यावर ; द्विपक्षीय भागीदारीसाठी 'या' देशांना देणार भेट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारताची इथिओपियाला राजनैतिक भेट ; PM मोदींच्या दौऱ्याने बदलणार आफ्रिकेतील समीकरण?
पंतप्रधान मोदी जॉर्डनमध्ये दोन दिवसीय दौऱ्यावर असतील.आज ते जॉर्डनला रवाना होणार आहेत. या दौऱ्यावेळी ते जॉर्डनचे राजा अब्दुल्लाह द्वितीय बिन अल हुसेन यांची भेट घेणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी हुसेन यांच्या द्विपक्षीय संबंधावर चर्चा करतील. जॉर्डन आणि भारताचे द्विपक्षीय संबंध वाढवणे हा याचा हेतू आहे. यानंतर पंतप्रधान मोदी इथिओपियाला रवाना होतील 16 ते 17 डिसेंबर रोजी इथिओपियात असतील आणि नंतर ते 18 डिसेंबरला ओमानला भेट देतील.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जॉर्डन दौरा अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. दोन्ही देशांच्या आर्थिक सहकार्याला बळकट करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असणार आहे. यामुळे प्रादेशिक शांतता देखील प्रस्थापित होईल असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी 16 डिसेंबर रोजी इथिओपियाला रवाना होती. हा दौरा भारताच्या आफ्रिकन खंडाती वाढत्या प्रभावासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. इथिओपियाचे पंतप्रधान अॅबी अहमद अली यांच्या निमंत्रणावरुन हा दौऱा होत आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधान आदिस अबाब येथे इथिओपियाच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ग्लोबल साउथचा महत्त्वपूर्ण भागीदारा म्हणून ही भेट दोन्ही देशांच्या मैत्री आणि द्विपक्षीय सहकार्याच्या घनिष्ठ संबंधासाठी महत्त्वाची आहे.
इथिओपियानंतर पंतप्रधान मोदी १७ डिसेंबर रोजी ओमानला रवाना होणार आहे. यावेळी ते ओमानच्या सल्तनेचे मोदी सुलतान हैथम बिन तारिक यांची भेट घेणार आहेत. भारत आणि ओमानच्या द्विपक्षीय संबंधाना आता ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दुसरा ओमान दौरा असणार आहे. यावेळी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, तंत्रज्ञान, शेती आणि संस्कृती यांसारख्या क्षेत्रांसह द्विपक्षीय भागीदारीचा आढावा घेणार आहे. तसेच जागतिक स्तरावर घडत असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही चर्चा केली जाणार आहे.






