Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malaria: पावसाळ्यात वाढतो मलेरियाचा धोका; लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम, जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे

Malaria Early Symptoms: पावसाळ्यात मलेरियाचा धोका वाढतो, विशेषतः लहान मुलांमध्ये संसर्ग गंभीर ठरू शकतो. त्यामुळे मलेरियाची सुरुवातीची लक्षणे ओळखून वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 04, 2026 | 06:33 PM
Malaria: पावसाळ्यात वाढतो मलेरियाचा धोका; लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम, जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे
Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात वाढतो मलेरियाचा धोका
  • लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम
  • जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे

पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या झपाट्याने वाढते आणि त्यासोबतच मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका अधिक वाढतो. हा आजार कोणालाही होऊ शकतो, मात्र लहान मुलांसाठी तो विशेषतः धोकादायक ठरू शकतो. मुलांची प्रतिकारशक्ती प्रौढांच्या तुलनेत कमी असल्याने संसर्गाचा परिणाम अधिक गंभीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी मलेरियाची सुरुवातीची लक्षणे ओळखून योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. मलेरियाची सुरुवातीची लक्षणे कोणती, जाणून घ्या.

Health Tips: जेवणानंतर चहा पिण्याची सवय आहे का? आरोग्यासाठी ठरू शकते घातक; ‘हे’ परिणाम एकदा वाचाच

लहान मुलांना धोका अधिक का असतो?

विशेषतः पाच वर्षांखालील मुलांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे डासांद्वारे पसरणाऱ्या मलेरियाच्या परजीवीचा संसर्ग झाल्यास त्यांचे शरीर त्याला प्रभावीपणे तोंड देऊ शकत नाही. कुपोषण, अस्वच्छ परिसर, घराजवळ साचलेले पाणी आणि डासांची वाढलेली संख्या यामुळे संसर्गाचा धोका आणखी वाढतो.

मलेरियाची सुरुवातीची लक्षणे कशी ओळखाल?

सुरुवातीला मलेरियाची लक्षणे साध्या तापासारखी वाटू शकतात. वारंवार किंवा तीव्र ताप येणे, थंडी वाजणे, अंगदुखी, डोकेदुखी, जास्त घाम येणे आणि अशक्तपणा जाणवणे ही सामान्य लक्षणे आहेत. लहान मुलांमध्ये दूध किंवा अन्न खाण्यास नकार देणे, सतत रडणे, चिडचिड करणे, खेळण्यात रस कमी होणे किंवा अत्यंत सुस्ती दिसणे ही देखील मलेरियाची संकेत असू शकतात.

उपचारात विलंब जीवावर बेतेल?

वेळीच उपचार न मिळाल्यास मलेरिया गंभीर वाढू शकतो. काही प्रकरणांमध्ये झटके येणे, रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे तसेच मेंदू, यकृत किंवा मूत्रपिंडावर परिणाम होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ताप कायम राहिल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

मुलांना  सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

  • घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका.
  • मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करायला लावा.
  • झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
  • डासांपासून बचावासाठी सुरक्षित रिपेलंटचा वापर करा.
  • ताप, थंडी किंवा इतर संशयास्पद लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • घर आणि परिसर स्वच्छ ठेवा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Monsoon Hair Care: पावसात भिजल्यानंतर केसांची काळजी कशी घ्यावी? ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

Web Title: Malaria risk monsoon children symptoms prevention treatment mosquito borne diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • malaria
  • Monsoon

संबंधित बातम्या

बाहेर पाऊस जोराचा, आत ग्लास दारूचा! पावसाळ्यात कोणत्या दारूसोबत कोणता महाराष्ट्रीयन चकणा जमेल नंबर वन?
1

बाहेर पाऊस जोराचा, आत ग्लास दारूचा! पावसाळ्यात कोणत्या दारूसोबत कोणता महाराष्ट्रीयन चकणा जमेल नंबर वन?

Monsoon Health Tips: मुंबईमध्ये पावसाळी आजारांचा कहर! तज्ज्ञांचा ताप, डेंग्यू आणि मलेरियाबाबत गंभीर इशारा
2

Monsoon Health Tips: मुंबईमध्ये पावसाळी आजारांचा कहर! तज्ज्ञांचा ताप, डेंग्यू आणि मलेरियाबाबत गंभीर इशारा

जांभूळ बियांची पावडर शरीरासाठी ठरेल वरदान! मधुमेह नियंत्रणात राहण्यासोबतच आतड्यांचे आरोग्य सुद्धा राहील सक्रिय
3

जांभूळ बियांची पावडर शरीरासाठी ठरेल वरदान! मधुमेह नियंत्रणात राहण्यासोबतच आतड्यांचे आरोग्य सुद्धा राहील सक्रिय

Health Update: ‘टाटा’च्या संशोधनाला जागतिक मान्यता! केमोथेरपीत पपईच्या पानांचा अर्क प्रभावी ठरल्याचे निष्कर्ष
4

Health Update: ‘टाटा’च्या संशोधनाला जागतिक मान्यता! केमोथेरपीत पपईच्या पानांचा अर्क प्रभावी ठरल्याचे निष्कर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.