
Healthy Vegetable : हिवाळ्यात बाजारात अनेक हंगामी भाज्या विक्रीसाठी येतात. या भाज्यांमध्ये अनेक असे औषधी गुणधर्म दडलेले असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यास आणि आजरांपासून सुटका करण्यास आपली मदत करतात.
कॅन्सरच्या रुग्णांसाठी लाभदायक
मुळ्यामधील फॉलिक ॲसिड आणि विटामिन सी हे घटक कैन्सरशी लढण्यास मदत करतात. तोंड, पोट, आतडे, किडनी यांना होणाऱ्या कॅन्सरसाठी मुळा गुणकारी आहे.
सर्दी आणि खोकल्यासाठी उपयुक्त
मुळ्याची साल सर्दीवर गुणकारी ठरते. तसेच लहान मुलांमधील सर्दी कमी करण्यासाठी मुळा उपयुक्त असतो. या मोसमात मानवाचे शरीर मजबूत करण्यासाठी जेवणात मुळ्याचा वापर करावा.
रोज राहा निरोगी
बदलत्या हवामानात आपण सतत आजारी पडत असाल तर आपल्या जेवणात मुळ्याचा वापर करावा. मुळ्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत होते. रक्तवाहिन्या प्रवाहीत होण्यास कच्या मुळ्याच्या पानांची भाजी बनवून खाने फायदेशीर ठरते.
रक्तातील पिवळापणा दूर होतो
रोज सकाळी एक मुळा खाल्याने रक्तातील पिवळापणा दूर होवून आराम मिळतो. मुत्राशयातील आजार, कोरड्या ढेकार येत असल्यास त्यावर मुळ्याचा रस उपयुक्त ठरतो.
मधुमेसाठी गुणकारी
रोज सकाळी मुळा खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. ते मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी आहारात समाविष्ट केले जाऊ शकते. तुम्ही मुळ्यापासून फक्त भाजीचं नाही तर मुळ्याचे पराठे, लोणचे असे अनेक पदार्थ बनवून खाऊ शकता.
चेहऱ्यावर तेज येण्यास मदत
मुळ्याचे सेवन तुमच्या चेहऱ्याचेही आरोग्य निरोगी बनवण्यास तुमची मदत करत असते. चेहऱ्यावरील मुरूमांचा त्रास कमी करण्यासाठी मुळ्याचा वापर केला जाऊ शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.