Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना HST तिकिटाविषयी माहिती असायलाच हवी! एकदाच तिकीट काढा आणि मिळवा अनेक फायदे

रोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेचे अर्धवार्षिक सीझन तिकीट (HST) अत्यंत किफायतशीर पर्याय आहे. सहा महिन्यांसाठी वैध असलेला हा पास वेळ आणि खर्च दोन्ही वाचवतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 26, 2025 | 08:29 AM
रोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना HST तिकिटाविषयी माहिती असायलाच हवी! एकदाच तिकीट काढा आणि मिळवा अनेक फायदे

रोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना HST तिकिटाविषयी माहिती असायलाच हवी! एकदाच तिकीट काढा आणि मिळवा अनेक फायदे

Follow Us
Close
Follow Us:
  • HST तिकीट ६ महिन्यांसाठी वैध असते
  • हे तिकीट फक्त ठराविक रूट आणि जनरल कोचमध्येच मान्य असते.
  • तिकीट काउंटरवर साधा फॉर्म भरून सहजपणे HST तयार करता येते.
दिल्ली, गाझियाबाद, सोनीपत, पानीपत यांसारख्या भागांमध्ये रोज लाखो लोक नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी रेल्वेचा वापर करतात. रोजची ये-जा करताना सामान्य प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी मोठ्या रांगांना सामोरे जावे लागते आणि वेळही वाया जातो. तसेच दररोज तिकीट घेणे आर्थिकदृष्ट्या देखील खर्चिक ठरते. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने अर्धवार्षिक सीझन तिकीट (Half Yearly Season Ticket – HST) ही सुविधा उपलब्ध केली आहे. हा एक असा पास आहे जो रोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयोगी आणि किफायतशीर ठरतो.

देवालाही थंडी वाजते….पुण्यातील या मंदिरात हिवाळ्यात गणपतीला घातले जातात कपडे, गोंडस रूप पाहूनच मन मोहित होईल

HST तिकीट म्हणजे काय?

HST म्हणजे Half Yearly Season Ticket, म्हणजे सहा महिन्यांसाठी मिळणारा ट्रेन पास. हा पास घेतल्यावर प्रवाशाला त्या विशिष्ट मार्गावर ठराविक तारखेपर्यंत, म्हणजे नेमके ६ महिने, दररोज तिकीट काढण्याची आवश्यकता राहत नाही. सतत एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या कम्युटर्ससाठी हा पास वेळ आणि पैशांची मोठी बचत करतो. उदाहरणार्थ, दिल्ली–गाझियाबाद किंवा दिल्ली–सोनीपत मार्गावर सतत प्रवास करणाऱ्यांना या पासचा मोठा फायदा होतो.

तिकीटाची वैधता किती दिवस असते?

या तिकिटाचे वैशिष्ट्य म्हणजे याची ६ महिन्यांची वैधता. सहा महिने संपल्यानंतर तिकीट आपोआप अवैध ठरते आणि ते पुन्हा रिन्यू करावे लागते. वैधता संपल्यानंतर त्याच तिकिटावर प्रवास करताना पकडले गेल्यास दंड आकारला जातो आणि अतिरिक्त तिकीट शुल्कही लागू होऊ शकते. त्यामुळे तिकीटाचा कालावधी संपण्याआधी ते वेळेत नूतनीकरण करणे आवश्यक आहे.

कोणत्या मार्गांवर आणि कोणत्या कोचमध्ये लागू असते?

  • HST तिकीट हे फक्त एका निश्चित मार्गासाठी असते. म्हणजे तुम्ही दिल्ली–पानीपत या मार्गासाठी पास घेतला असेल तर तो केवळ त्या मार्गावरच लागू राहतो.
  • याशिवाय, हे तिकीट जनरल (Unreserved) कोच साठीच मान्य असते.
  • स्लीपर किंवा एसी कोचमध्ये या तिकिटावर प्रवास करण्याची परवानगी नसते. तसे करताना पकडले गेल्यास दंड ठोठावला जाऊ शकतो.
एकमेव असे रेल्वे स्टेशन जिथून देशातील प्रत्येक कोपऱ्यात धावते ट्रेन, 10 प्लॅटफॉर्म अन् 24/7 मिळते सर्व्हिस

हे तिकीट कसे बनवायचे?

  • HST बनवण्याची प्रक्रिया सोपी आहे.
  • जवळच्या कोणत्याही रेल्वे स्टेशनवरील तिकीट काउंटरवर जा.
    तेथे उपलब्ध छोटा अर्ज भरा.
  • तुमचा मार्ग, प्रवास तारखा आणि ओळखपत्र तपासल्यानंतर कर्मचारी तुमचे HST तिकीट तयार करून देतील.
  • हा पास दररोज ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत सोयीचा असून प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी करतो. रोजच्या रांगा, वेळेचा अपव्यय आणि तिकीट खरेदीची धावपळ यापासून मुक्तता मिळते.

Web Title: What is the benefits of indian railways half yearly season ticket travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 08:29 AM

Topics:  

  • Indian Railway
  • lifestyle news
  • travel news

संबंधित बातम्या

ना क्रीम ना औषध… फक्त 7 दिवसांत चेहऱ्यावरील सर्व डाग, पिगमेंटेशन होईल दूर; 5 रुपयांचा हा उपाय करा आणि कमाल पहा
1

ना क्रीम ना औषध… फक्त 7 दिवसांत चेहऱ्यावरील सर्व डाग, पिगमेंटेशन होईल दूर; 5 रुपयांचा हा उपाय करा आणि कमाल पहा

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास जीवघेणा ठरतोय? घरगुती उपायांनी दूर करता येतील असह्य वेदना
2

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास जीवघेणा ठरतोय? घरगुती उपायांनी दूर करता येतील असह्य वेदना

एकमेव असे रेल्वे स्टेशन जिथून देशातील प्रत्येक कोपऱ्यात धावते ट्रेन, 10 प्लॅटफॉर्म अन् 24/7 मिळते सर्व्हिस
3

एकमेव असे रेल्वे स्टेशन जिथून देशातील प्रत्येक कोपऱ्यात धावते ट्रेन, 10 प्लॅटफॉर्म अन् 24/7 मिळते सर्व्हिस

ऑफिस अफेअर्सच्या बाबतीत जगभरात हे 5 देश सर्वाधिक पुढे… भारताचा नंबर कोणत्या क्रमांकावर? वाचाल तर अचंबित व्हाल
4

ऑफिस अफेअर्सच्या बाबतीत जगभरात हे 5 देश सर्वाधिक पुढे… भारताचा नंबर कोणत्या क्रमांकावर? वाचाल तर अचंबित व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.