बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास काय खावे (फोटो सौजन्य - iStock)
बद्धकोष्ठता ही पोटाशी संबंधित समस्या आहे ज्यामध्ये शौचास त्रास होतो आणि बराच वेळ शौचालयात राहिल्यानंतरही पोट व्यवस्थित साफ होत नाही. अनेकांना या पोटाच्या समस्यांचा त्रास होतो. बद्धकोष्ठतेमुळे सकाळी पोट व्यवस्थित साफ न झाल्याने व्यक्ती ऑफिसला जाते, परंतु दिवसभर पोट फुगलेले राहते, पोटात जडपणा येतो आणि अस्वस्थता येते. अशा परिस्थितीत, आहारतज्ज्ञांनी दिलेल्या टिप्स पोट साफ करण्यासाठी कशा उपयुक्त ठरू शकतात ते येथे जाणून घ्या.
आहारतज्ज्ञ शिल्पा अरोडा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्या सांगत आहेत की कोणत्या गोष्टी खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत याबाबत त्यांनी संपूर्ण माहिती दिली आहे. तुम्हालाही हा त्रास असेल तर आजच हा पदार्थ खाण्यास सुरूवात करा.
बद्धकोष्ठतेपासून सुटकेसाठी कोणता पदार्थ खावा?
गाजर आणि पपईचा आहारात समावेश करून घ्या
पपईचा पराठा
या व्हिडिओमध्ये शिल्पा अरोडा यांना पपईचा पराठा खाण्याचा सल्लाही दिला आहे. पण तुम्हाला जर प्रश्न असेल की, पपईचा पराठा कसा खावा, तर हे नक्की वाचा. पपईचा पराठा बनवताना, लक्षात ठेवा की तुम्ही त्यावर देशी तूप लावून तो पराठा भाजावा. देशी तूप वंगण म्हणून काम करते आणि हार्मोनल संतुलनासदेखील मदत करते. हा पराठा खाल्ल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळेल. याचे तुम्ही नाश्त्यात नियमित सेवन करू शकता. मात्र प्रमाणाच्या बाहेर याचे सेवन करू नये.
Chronic Constipation: बद्धकोष्ठतेने झालेत हाल? वेळीच लावा 5 सवयी; पोटात साचलेली घाण पडेल बाहेर
बद्धकोष्ठता का होते?
बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होण्याचे कारण
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.