
नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. बाप्पाच्या स्वागताची मोठ्या जलौषात तयारी केली जात आहे. सगळीकडे बाप्पा येणाचा मोठा उत्साह आहे. गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. बाप्पाच्या आगमनानंतर ६ दिवस वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे झटपट तुम्ही बदामाचा शिरा बनवू शकता. सुंदर सोनेरी रंग, तुपाचा दरवळ आणि बदामाची चव शिऱ्याची शोभा वाढवते. बदाम केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत. नैवेद्यात कायमच तेच ठराविक पदार्थ बनवले जाते.त्यामुळे बाप्पाच्या प्रसादासाठी नेहमीच नवनवीन पदार्थ बनवावेत. चला तर जाणून घेऊया बदाम शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)