
Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक
Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कायमच वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कधी साबुदाणा खीर, गव्हाची खीर तर कधी गुलाबजाम, मिठाईचे पदार्थ विकत आणले जातात. पण नेहमीच तेच विकतचे पदार्थ बाप्पाच्या नैवेद्यात दाखवण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही खजूर रोल बनवू शकता. खजूर रोल बनवण्यासाठी जास्त वेळ सुद्धा लागत नाही. खजूर शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. यामुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून निघते आणि सुकामेवा खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. संध्याकाळच्या वेळी हलकीशी भूक लागल्यानंतर नेहमीच काय खावे, असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी झटपट तयार होणारे खजूर रोल तुम्ही बनवून ठेवू शकता. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहील आणि शरीराला सुद्धा फायदे होतील. चला तर जाणून घेऊया खजूर रोल बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी