Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवघ्या 10 मिनिटात करा वर्षभराचा गरम मसाला घरी, राहील फ्रेश आणि सुगंधी, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

Garam Masala Recipe: भारतीय जेवणात भाज्यांचा स्वाद वाढविण्यासाठी गरम मसाला अनेकदा वापरला जातो. पण सर्रासपणे हा मसाला आपण बाहेरून विकत आणतो. घरच्या घरी कमीत कमी वेळात तुम्हीही स्वादिष्ट गरम मसाला करू शकता. ज्याचा सुगंधही चांगला असेल आणि मसाला वर्षभर टिकेल.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 07, 2024 | 12:20 PM
Garam Masala

Garam Masala

Follow Us
Close
Follow Us:

How To Make Garam Masala: गरम मसाला हा भारतीय खाद्यपदार्थाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. भारतातील प्रत्येक घरातील किचनमध्ये गरम मसाला दिसून येतोच. गरम मसाल्याशिवाय जेवणाला चव येत नाही. बहुतेक लोक बाजारातून बनवलेला गरम मसाला विकत घेतात आणि घरी आणतात, तर काही लोकांना गरम मसाला घरी तयार करायला आवडतो. अनेक मसाले मिसळून तयार केलेला गरम मसाला शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. 

पण बऱ्याच जणांना वाटतं की गरम मसाला घरी तयार करणे कठीण आहे आणि तो जास्त दिवस टिकत नाही. मात्र असे अजिबात नाही. जर गरम मसाला घरी तयार केला असेल तर त्याची शुद्धता पूर्णपणे असते आणि त्यामुळे आरोग्यालाही त्रास होत नाही. घरगुती गरम मसाला वर्षभर टिकतो आणि त्याचा सुगंधही दरवळत राहतो. जर तुम्हाला गरम मसाला घरी तयार करायचा असेल तर तुम्ही 10 मिनिटांत तयार करून स्टोअर करू शकता. कसा ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगतो. (फोटो सौजन्य – Pixabay) 

[read_also content=”बर्फ घालून कणीक भिजवल्यास कशी होते चपाती https://www.navarashtra.com/lifestyle/benefits-of-knead-dough-with-ice-cubes-can-make-soft-chapati-recipe-536724.html”]

गरम मसाला बनवण्यासाठी साहित्य

  • जिरे – 1/2 कप
  • बडीशेप – 1/4 कप
  • काळी मिरी – 1 टेबलस्पून
  • धणे – 1/4 कप
  • जायपत्री – 2 टीस्पून
  • शाही जिरे – 1 टीस्पून
  • पुष्पचक्र – 2
  • सुंठ पावडर – 2 टीस्पून
  • साखर – 1 टीस्पून
  • लहान वेलची – 15-20
  • मोठी वेलची – 4-5
  • लवंगा – 15-20
  • जायफळ – 1
  • दालचिनी – 1 टेबलस्पून
  • तमालपत्र – 8-10
  • कोरडे आले
गरम मसाला कसा बनवायचा

गरम मसाला घरी बनवणे अगदी सोपे आहे. ते बनवायला फक्त काही मिनिटे लागतात आणि ते एका वर्षासाठी सहजपणे साठवले जाऊ शकते. 

  • गरम मसाला तयार करण्यासाठी प्रथम वर दिलेले सर्व मसाले घ्या आणि ते पूर्णपणे स्वच्छ करा
  • यानंतर, प्रत्येक गोष्ट 12 तास सूर्यप्रकाशात वेगळ्या सुकवून घ्या. असे केल्याने मसाल्यातील ओलावा निघून जाईल किंवा दमटपणा असेल तर निघून जाईल
  • जर मसाले खूप ओलसर वाटत असतील तर ते 2 दिवस उन्हात वाळवले जाऊ शकतात
  • जेव्हा तुम्हाला गरम मसाला तयार करायचा असेल, तेव्हा एका कढईत सर्व मसाले एक एक करून टाका आणि थोडा वेळ मध्यम आचेवर शिजवा. लक्षात ठेवा की त्याचा रंग बदलेल अशा पद्धतीने मसाले परतू नका अथवा शिजवू नयेत 
  • सर्व मसाले भाजून झाल्यावर मिक्सर ग्राइंडरमध्ये टाका
  • बारीक पावडर तयार होईपर्यंत सर्व मसाले बारीक करा 
  • यानंतर एका मोठ्या भांड्यात मसाले गाळून घ्या. नंतर मसाल्यात कोरडे आले मिसळा. शुद्ध आणि चवदार गरम मसाला तयार आहे. पूर्णपणे थंड झाल्यावर काचेच्या बरणीत मसाला भरून ठेवा आणि वर्षभर वापरा

Web Title: Garam masala homemade recipe how to make at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2024 | 11:29 AM

Topics:  

  • easy food recipes

संबंधित बातम्या

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने
1

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी
2

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी

साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी
3

साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : शाही, सुगंधित चवीचा ‘बगारा राईस’ तुम्ही कधी खाल्ला आहे का? एकदा घरी बनवूनच पहा
4

Recipe : शाही, सुगंधित चवीचा ‘बगारा राईस’ तुम्ही कधी खाल्ला आहे का? एकदा घरी बनवूनच पहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.