Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्‍लास ग्‍लो! ५ रुपयांच्या टिश्यू पेपरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, घरीच बनवा फेस शीट मास्क

चेहऱ्यावर कोरियन महिलांप्रमाणे काचेसारखा ग्लो मिळवण्यासाठी ५ रुपयांच्या टिश्यू पेपरपासून घरीच फेस शीट मास्क बनवू शकता. हा शीट मास्क त्वचा आतून हायड्रेट करण्यासोबतच त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 29, 2026 | 09:39 AM
चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्‍लास ग्‍लो! ५ रुपयांच्या टिश्यू पेपरचा 'या' पद्धतीने करा वापर, घरीच बनवा फेस शीट मास्क

चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्‍लास ग्‍लो! ५ रुपयांच्या टिश्यू पेपरचा 'या' पद्धतीने करा वापर, घरीच बनवा फेस शीट मास्क

Follow Us
Follow Us:

सर्वच महिला चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. फेसमास्क, फेस सीरम, फेसपॅक इतर वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी केला जातो. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मुरूम, पुरळ घालवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी महागड्या क्रीम लावून त्वचेची काळजी घेतली जाते तर कधी महागड्या स्किन ट्रीटमेंट करून चेहऱ्यावरील ग्लो वाढवला जातो. पण वारंवार केमिकल युक्त स्किन केअरचा वापर केल्यास त्वचेसंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. काचेसारख्या चमकदार त्वचेसाठी कोरियन स्किन केअर प्रॉडक्टचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. शीट मास्क किंवा स्किन केअर प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी हजारो रुपये खर्च केला जातो. पण आज आम्ही तुम्हाला ५ रुपयांच्या टिश्यू पेपरचा वापर करून फेस शीट मास्क बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

भुवयांचे केस गळून पातळ झाले आहेत? मग नॅचरली आयब्रो आणि काळे करण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

कोरियन शीट मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • साधा टिश्यू पेपर किंवा पेपर नॅपकिन
  • तांदळाचे पाणी
  • कोरफड जेल
  • मध

कृती:

शीट मास्क तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये तांदळाचे पाणी, कोरफड जेल आणि मध एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेले फेस सीरम व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तयार टिश्यू पेपर पूर्णपणे भिजवून ओला करा. त्यानंतर हलक्या हाताने काढून संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित मास्क लावून १० मिनिटं तसाच ठेवा. टिश्यू पेपर पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर काढून त्वचेवर तयार केलेले फेस सीरम लावून काहीवेळ तसेच ठेवा. फेस सीरम लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून घ्या. यामुळे त्वचेमधील रक्तभिसरण सुधारेल आणि त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. फेस शीट लावल्यानंतर त्वचा धुवण्याची किंवा पुसण्याची अजिबात आवश्यकता नाही.

पावसाळ्यात केवळ पाणी पिणे पुरेसे का नसते? शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्सही महत्त्वाचे, जाणून घ्या सविस्तर

फेस शीट मास्क लावण्याचे फायदे:

तांदळाच्या पाण्यात अमिनो ॲसिड, अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. तांदळाचे पाणी त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. मध नॅचरल मॉइश्चरायझर म्हणून ओळखले जाते. मधातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. यामुळे त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो. कोरफड जेल त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यास मदत करतात. याशिवाय चेहरा हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफड जेल चेहऱ्यावर लावले जाते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Get an instant glass like glow on your face use a tissue paper in this way to make a face sheet mask at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Alovera jel
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
1

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल
2

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
3

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
4

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.