Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांढऱ्याशुभ्र आणि तुकतुकीत त्वचेसाठी घरीच तयार करा तांदळाचा साबण, कोरियन महिलांप्रमाणे चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी तांदळापासून बनवलेल्या साबणाचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि त्वचा उजळदार दिसते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 21, 2026 | 03:12 PM
पांढऱ्याशुभ्र आणि तुकतुकीत त्वचेसाठी घरीच तयार करा तांदळाचा साबण, कोरियन महिलांप्रमाणे चेहरा- शरीरावर येईल चमकदार ग्लो

पांढऱ्याशुभ्र आणि तुकतुकीत त्वचेसाठी घरीच तयार करा तांदळाचा साबण, कोरियन महिलांप्रमाणे चेहरा- शरीरावर येईल चमकदार ग्लो

Follow Us
Follow Us:

वाढत्या उन्हाळ्यात शरीरसोबतच त्वचा आणि केसांची खूप जास्त काळजी घेतली जाते. उन्हात गेल्यानंतर चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग, पिंपल्स, रखरखीत त्वचा, कोरडे केस इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. उन्हामुळे चेहऱ्यावरील चमक कमी झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या महागड्या बॉडी वॉश किंवा इतर स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात आणि चेहऱ्यावरील ओलावा कमी होऊन जातो. सर्वच महिलांना चेहऱ्यावर कोरियन महिलांप्रमाणे चमकदार ग्लो हवा असतो. त्यामुळे सतत काहींना काही केले जाते. पण चुकीचे स्किन केअर किंवा वारंवार केलेल्या महागड्या प्रॉडक्टच्या वापरामुळे त्वचेला हानी पोहचते.(फोटो सौजन्य – istock)

तरुण वयात चेहऱ्यावर आलेले पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स होतील कायमचे गायब! चिमूटभर जेष्ठमधाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट न करता घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक घरातील तांदळाचा वापर करून होममेड साबण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तांदळापासून बनवलेला साबण चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करून त्वचा हायड्रेट आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करतो. चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिंपल्स आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी तांदळाच्या साबणाचा वापर करावा. हा साबण त्वचा खोलवर मॉइश्चराईज करण्यास मदत करतो. चला तर जाणून घेऊया साबण बनवण्याची कृती.

तांदळाचा साबण बनवण्याची सोपी रेसिपी:

  • तांदूळ
  • बटाटा
  • कच्चे दूध
  • बदाम तेल
  • कोरफड जेल
  • विटामिन ई कँप्सूल
  • साबण बेस

साबण बनवण्याची कृती:

तांदळाचा साबण तयार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये ३ किंवा ४ चमचे तांदूळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर तांदूळ व्यवस्थित भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट गाळून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये तांदळाचे दूध घेऊन त्यात बटाट्याचा रस मिक्स करा. त्यानंतर कच्चे दूध, कोरफड जेल आणि बदाम तेल, विटामिन ई कँप्सूल घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेली पेस्ट मिक्स करून झाल्यानंतर काहीवेळ बाजूला ठेवा. त्यानंतर डबल बॉयलर पद्धतीने साबण बेस पूर्णपणे वितळवून त्यात तयार केलेले तांदळाचे मिश्रण घालून मिक्स करा आणि साबणाच्या साच्यात किंवा कोणत्याही आकाराच्या वाटीमध्ये ठेवून ५ ते ६ तास सेट करून घ्या. साबण सेट करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावा.

वयाच्या ३० व्या वर्षानंतर सुद्धा टिकून राहील त्वचेचे सौंदर्य! जास्त खर्च न करता नियमित फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

तांदळाच्या साबणाचा नियमित वापर केल्यास चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होण्यासोबतच त्वचा उजळदार आणि ग्लोइंग दिसेल. यामध्ये असलेले कच्चे दूध, बटाट्याचा रस चेहऱ्यावर जमा झालेल्या मृत पेशी कमी करण्यासाठी मदत करतात. उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी तांदळाच्या साबणाचा वापर करावा. दुधामध्ये असलेले गुणकारी घटक सैल झालेली त्वचा घट्ट करून चेहऱ्यावरील तारुण्य वाढवतात. दोन ते तीन आठवडे साबणाचा नियमित वापर केल्यास फरक दिसून येईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Get radiant korean style glow make rice soap at home for bright and smooth skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

CDSCO : गोऱ्या रंगाच्या हव्यासापोटी विकत घेताय गंभीर आजार? पाकिस्तानातून येणाऱ्या ‘या’ 2 प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधनांवर बंदीचा इशारा
1

CDSCO : गोऱ्या रंगाच्या हव्यासापोटी विकत घेताय गंभीर आजार? पाकिस्तानातून येणाऱ्या ‘या’ 2 प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधनांवर बंदीचा इशारा

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
2

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल
3

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
4

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.