
Refrigerator Maintenance Tips: मुंबईकरांनो, कोकणात निघताय? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मात्र घर किती दिवस बंद राहणार आहे, यावर योग्य निर्णय अवलंबून असतो. दोन-तीन दिवसांची छोटी ट्रिप असेल तर फ्रीज बंद करण्याची गरज नसते. पण आठवडा, पंधरा दिवस किंवा त्याहून अधिक काळ घर बंद राहणार असेल, तर फ्रीजची तयारी करून ठेवणे चांगले. Refrigerator Maintenance Tips:
समजा तुम्ही चार-पाच दिवसांसाठी गावी जात असाल तर फ्रीजचा प्लग काढून ठेवण्यापेक्षा तो कमी कुलिंगवर ठेवणे सोयीचे होईल. त्यामुळे भाज्या, अन्न लवकर खराब होत नाही. मात्र जे पदार्थ टिकणारे आहेत ते योग्य प्रकारे ठेवू शकता. दररोज सारखे भाजी, दूध नसल्याने त्याचे कूलिंग नेहमीसारखे ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे तापमान कमी सेट केल्यास विजेचा वापरही काही प्रमाणात कमी होतो. छोट्या प्रवासासाठी हा पर्याय अधिक सोयीचा आहे.
जर तुम्ही दहा दिवस, पंधरा दिवस किंवा महिनाभरासाठी बाहेर जाणार असाल, तर फ्रीज सुरु ठेवण्यापेक्षा बंद केला तर सोयीचे राहू शकते, त्यामुळे मुख्य वीज सुद्धा बंद करता येईल.सर्वात आधी फ्रीज आणि फ्रीझरमधील वस्तू बाहेर काढा. पाण्याच्या बाटल्या, भाज्या, उरलेले पदार्थ, सॉस आणि इतर खाद्यपदार्थ तपासा. काही वस्तू वापरायच्या असतील तर त्या आधी संपवणे चांगले.
यानंतर फ्रीज बंद करून त्यातील बर्फ पूर्णपणे वितळू द्या. हे काम घाईत करू नका. बर्फ वितळल्यानंतर आत साचलेले पाणी कापडाने व्यवस्थित पुसून काढा.
फ्रीज बंद करून आत अन्नाचे तुकडे, पाणी किंवा डाग राहिले तर काही दिवसांनी त्यातून कुबट वास येऊ शकतो. बंद जागेत ओलावा राहिल्यामुळे बुरशी वाढण्याची शक्यता देखील असते.म्हणून फ्रीज रिकामा केल्यानंतर आतील भाग स्वच्छ कापडाने पुसून पूर्ण कोरडा करा. घरात उपलब्ध असेल तर थोडे बेकिंग सोडा किंवा लिंबाचे पाणी वापरून आतील भाग स्वच्छ करता येतो. मात्र साफ केल्यानंतर ओलसरपणा अजिबात राहू देऊ नका.
फ्रीज बंद केल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट अनेकजण विसरतात. दरवाजा घट्ट लावून ठेवू नका. फ्रीज आतून पूर्ण कोरडा झाल्यावर त्याचा दरवाजा थोडासा उघडा राहील अशा पद्धतीने ठेवा. गरज असल्यास कापडाचा छोटा तुकडा अडकवून ठेवू शकता. त्यामुळे आत हवा फिरत राहते आणि ओलसर वातावरण तयार होत नाही.यामुळे घरात परतल्यानंतर फ्रीज उघडल्यावर येणारा विचित्र वास आणि बुरशीची समस्या टाळण्यास मदत होते.
वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी
काही भागांमध्ये वीज वारंवार जाणे किंवा अचानक जास्त-कमी होणे ही सामान्य बाब आहे. घरात कोणी नसताना असा प्रकार झाला आणि फ्रीज सतत वीजेला जोडलेला असेल, तर उपकरणावर परिणाम होण्याची शक्यता असते.विशेषतः घरात योग्य संरक्षणाची सोय नसेल तर दीर्घकाळ बाहेर जाताना फ्रीज बंद ठेवणे सुरक्षित पर्याय ठरू शकतो.
आजच्या अनेक फ्रीजमध्ये साध्या कुलिंगव्यतिरिक्त ‘हॉलिडे’ किंवा ‘इको’सारखे पर्याय दिलेले असतात. घर काही दिवस रिकामे राहणार असेल तर या सुविधेचा उपयोग करता येतो.तुमच्या फ्रीजमध्ये अशी सुविधा आहे की नाही, हे त्याच्या मॅन्युअलमध्ये किंवा सेटिंगमध्ये पाहा. काही मॉडेलमध्ये या मोडमुळे विजेचा वापर कमी ठेवून फ्रीझरची गरजेनुसार कार्यप्रणाली सुरू राहते.