Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Gut Health: आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे अपचनाच्या समस्या वाढू लागतात. त्यामुळे आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि सॅलड यांसारख्या पदार्थांमधून शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 28, 2026 | 01:23 PM
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या 'या' बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या 'या' बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Follow Us
Follow Us:

अपचनाच्या समस्या कमी करण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल
अपचनाच्या समस्या वाढण्याची कारणे?
पचनक्रिया सुधारण्यासाठी काय खावे?

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होणे फार आवश्यक आहे. अन्यथा संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे अपचनाच्या समस्या वाढतात आणि आरोग्य बिघडते. रोजच्या आहारात तिखट, कमी फायबर असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत. कमी वेळा शौच होणे, शौच खूप कडक होणे, जोर लावावा लागणे किंवा शौच झाल्यानंतरही पोट पूर्ण साफ न झाल्यासारखे वाटणे इत्यादी बद्धकोष्ठतेचा लक्षणे दिसू लागतात.(फोटो सौजन्य – istock)

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

बद्धकोष्ठता वाढल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास मूळव्याध होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. बद्धकोष्ठतेचा त्रास वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने समस्या तीव्र होतात. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि वारंवार उद्भवणाऱ्या अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. कायमच तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी सात्विक अन्नपदार्थांचे सेवन करावे.

अपचनाच्या समस्या कमी करण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल:

कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर जर अपचनाची समस्या उद्भवत असेल तर आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि सॅलड यांसारख्या पदार्थांमधून शरीराला आवश्यक प्रमाणात फायबर मिळते. फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे आतड्यांची हालचाल सुरळीत चालू राहते आणि विषारी घटक सहज बाहेर पडून जातात. मैदा, प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा कमी तंतुमय पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास मलाचा आकार आणि मऊपणा कमी होऊ होतो, ज्यामुळे शौचाला त्रास होणे, पोटात जळजळ, कडक मल इत्यादी समस्या वाढतात. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे.

शरीराला आवश्यक प्रमाणात पाणी न मिळाल्यामुळे मोठ्या आतड्यांमधील मलामधून अधिक पाणी शोषून घेतले जाते. यामुळे उलट्या, मळमळ किंवा अपचनाच्या समस्या वाढू लागतात. दिवसभर कमी पाणी पिणे, जास्त घाम येणे किंवा उलटी-जुलाबामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. त्यामुळे तहान लागण्याची वाट न पाहता भरपूर पाणी पिणे, ताक इत्यादी थंड पदार्थांचे सेवन करावे.दिवसभर बसून राहणे, व्यायाम न करणे, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे पचनक्रिया बिघडते.

वयाच्या ७६ व्या वर्षी सुद्धा Narendra Modi ‘ही’ भाजी खाऊन आहेत हेल्दी! विटामिन बी १२ वाढण्यासोबतच हाडांच्या वेदना होतील कमी

पोट स्वच्छ होण्यासाठी आहारात बदल करण्यासोबतच दैनंदिन सवयींमध्ये सुद्धा बदल करणे आवश्यक आहे. झोपेची अनियमित वेळ, ताणतणाव आणि दिनचर्येत झालेले बदल पचनक्रियेवर परिणाम करतात. त्यामुळे कामाच्या वेळांमध्ये बदल, सात्विक आहार, भरपूर पाणी, फळे भाज्यांचा समावेश, शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. रोजच्या ठरलेल्या वेळी शौचाला जाणे आवश्यक आहे. अन्यथा आतड्यांमधील घाण तशीच साचून राहते, ज्याच्या परिणामामुळे उलट्या, मळमळ इत्यादी समस्या वाढतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सकाळी पोट व्यवस्थित साफ न होण्याची कारणे कोणती?

    Ans: कमी फायबरयुक्त आहार, पुरेसे पाणी न पिणे, शारीरिक हालचालींचा अभाव, अनियमित दिनचर्या किंवा बद्धकोष्ठता यामुळे पोट पूर्णपणे साफ न झाल्यासारखे वाटू शकते.

  • Que: पोट साफ होण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत?

    Ans: आहारात भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि इतर फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. फायबरचे प्रमाण हळूहळू वाढवणे आणि पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

  • Que: अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी काय खावे?

    Ans: हलका आणि संतुलित आहार घ्यावा. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि योग्य प्रमाणात प्रथिने यांचा समावेश करणे पचनासाठी उपयुक्त ठरू शकते.

Web Title: Gut health not getting a proper bowel movement in the morning make these diet changes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • gut health
  • Health Care Tips
  • Improves digestion

संबंधित बातम्या

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
1

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
2

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
3

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त
4

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.