
मानेवर साचून राहिलेल्या काळ्याकुटू थरांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग 'हा' घरगुती उपाय केल्यास त्वचा होईल उजळदार आणि स्वच्छ
सर्वच महिला चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतात. दिवसभरातून दोन ते तीन वेळा त्वचा पाण्याने स्वच्छ केली जाते. त्यानंतर त्वचेला होईल असे टोनर, सनस्क्रीन किंवा इतर वेगवेगळ्या क्रीम चेहऱ्यावर लावल्या जातात. पण मान, हाताचा कोपरा किंवा शरीरावर इतर अवयवांची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये घाम येतो. सतत येणाऱ्या घामामुळे त्वचेवर घाणीचे थर साचून राहतात. हे थर कालांतराने अतिशय काळेकुट दिसू लागतात. ज्यांच्या परिणामामुळे मानेवरील त्वचा निस्तेज आणि काळी दिसते. त्वचेच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी महिला कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर करतात.(फोटो सौजन्य – istock)
मानेवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी स्किन ट्रीटमेंट केल्या जातात. पण कालांतराने पुन्हा एकदा टॅनिंग वाढून त्वचा काळी दिसू लागते. जास्त वेळ उन्हात राहणे, घाम साचून राहणे, डेड स्किन साचणे, टाइट कपडे किंवा दागिन्यांचे घर्षण, प्रदूषण आणि त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे मानेवरील त्वचा काळी पडते. आज आम्ही तुम्हाला मानेवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासोबतच त्वचा स्वच्छ आणि चमकदार करतात. हार्मोन्समधील बदल, लठ्ठपणा किंवा इन्सुलिन रेझिस्टन्ससारख्या समस्या वाढून लागल्यानंतर सुद्धा त्वचा काळी पडते. अशावेळी कोणतेही उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मानेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. मानेवर जमा झालेली डेड स्किन पूर्णपणे नष्ट करण्यासाठी वाटीमध्ये बेकिंग सोडा घेऊन त्यात थोडस पाणी मिक्स करा आणि पेस्ट बनवा. तयार केलेली मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे मृत त्वचा नष्ट होण्यासोबतच त्वचेवर वाढलेला टॅनिंग कमी होईल. त्यानंतर त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास मान स्वच्छ होईल.
लिंबामध्ये असलेले विटामिन सी काळे डाग कमी करण्यास मदत करते. यासाठी वाटीमध्ये लिंबाचा रस आणि साखर एकत्र करून मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण कापसाच्या मदतीने मानेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे काळे डाग कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा धुवून टाका. संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी लिंबाचा स्क्रब मानेवर लावू नये. यामुळे त्वचेला हानी पोहचू शकते. कोणताही स्क्रब किंवा फेसपॅक लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावावे.