Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुरकुरीत, खुशखुशीत आणि चवदार सिंधी कोकी कधी चाखली आहे का? सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

सिंधी कोकी ही एक पौष्टिक, चवदार आणि पोटभरीची रेसिपी आहे, खास करून जेव्हा तुम्हाला थोडं हटके खायचं वाटतं. सिंधी खाद्यसंस्कृतीतील हा एक पारंपरिक पदार्थ आहे, जो चवीला छान खुशखुशीत लागतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 25, 2025 | 09:47 AM
कुरकुरीत, खुशखुशीत आणि चवदार सिंधी कोकी कधी चाखली आहे का? सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

कुरकुरीत, खुशखुशीत आणि चवदार सिंधी कोकी कधी चाखली आहे का? सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Follow Us
Follow Us:

सिंधी कोकी हा सिंधी खाद्यसंस्कृतीतील एक पारंपरिक आणि अत्यंत चविष्ट पदार्थ आहे जो गव्हाच्या पिठापासून तयार केला जातो. चवीला हे मसालेदार आणि खुसखुशीत असते. विशेषतः नाश्त्यासाठी किंवा प्रवासात सोबत घेऊन जाण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. कांदा, हिरवी मिरची, धणेपूड, जिरे आणि अजवाइन यामुळे तिचा स्वाद अनोखा आणि खास लागतो. खरपूस भाजलेली ही पोळी लोणचं अथवा दह्यासोबत चवीला फार अप्रतिम लागते.

पावसाळा होईल आणखीनच भारी! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा गरमागरम सूप, नोट करा हेल्दी रेसिपी

सकाळच्या नाश्त्याला तुम्हीही एक चविष्ट आणि मजेदार असा नाश्ता शोधत असाल आणि नवनवीन रेसिपी ट्राय करण्याची तुम्हाला आवड असेल तर सिंधी कोकी तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. झटपट तयार होणारा हा नाश्ता फार कमी साहित्यापासून तयार केला जातो आणि चवीलाही फार छान लागतो. चला लगेच नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • गव्हाचे पीठ – २ कप
  • बारीक चिरलेला कांदा – १ मध्यम
  • बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या – २
  • धणेपूड – १ टीस्पून
  • जिरे – १ टीस्पून
  • ओवा– १/२ टीस्पून
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – २ टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – २ टेबलस्पून (पीठ मळण्यासाठी)
  • तूप किंवा तेल – भाजण्यासाठी
  • पाणी – पीठ मळण्यासाठी
Scrambled Egg Recipe! साधा, सोपा आणि चवदार, नाश्त्याला एकदा जरूर बनवून पहा हा विदेशी नाश्ता

कृती

  • सिंधी स्टाईल कोकी तयार कारण्यासाठी सर्वप्रथम एका परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात चिरलेला कांदा, हिरवी
  • मिरची, कोथिंबीर, धणेपूड, जिरे, अजवाइन आणि मीठ टाका.
  • त्यात २ टेबलस्पून तेल घालून सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.
  • गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालून कडकसर पीठ मळून घ्या. पीठ झाकून १० मिनिटं ठेवून द्या.
  • पीठाचे समान आकाराचे गोळे करून त्याच्या कोक्यांच्या लोळ्या तयार करा.
  • एक गोळा घेऊन थोडी जाडसर पोळी (पराठ्यासारखी) लाटून घ्या.
  • तवा गरम करून त्यावर लाटलेली कोकी टाका. दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल लावून मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • गरम गरम सिंधी कोकी दही, लोणचं किंवा लसणाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
  • कांदा पिठात मिसळल्यानंतर लगेच कोकी बनवा, नाहीतर कांदा पाणी सोडतो.
  • अजून कुरकुरीतपणा हवा असेल तर भाजताना थोडे जास्त तूप वापरा.

Web Title: Have you ever tasted crispy and delicious sindhi koki perfect option for breakfast recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 09:46 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.