पावसाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवा गरमागरम सूप
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं काहींना कमी गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. तसेच पावसाळ्यात भाज्यांचे किंवा चिकन सूप अतिशय आवडीने प्यायले जाते. सूप प्यायल्यानंतर शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते.सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? हे घाईगडबडीमध्ये सुचत नाही. अशावेळी अनेक घरांमध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. बऱ्याचदा घरातील लहान मुलं भाज्या खाण्यास नकार देतात. अशावेळी मुलांना तुम्ही भाज्यांचे सूप किंवा इतर पदार्थ बनवून देऊ शकता. सूप प्यायल्यामुळे सर्दी, खोकला कमी होण्यास मदत होते. सकाळच्या नाश्त्यात सूप किंवा हेल्दी पदार्थ खाल्यानंतर दिवसभरात शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते आणि संपूर्ण दिवस आनंद उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये सूप बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
कोकणातील पारंपरिक पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रस खापरोळी, पदार्थाची चव चाखून मिळेल सुख