मुंबईमध्ये डेंग्यूनंतर चिकनगुनियाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ
संपूर्ण देशभरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर अतिशय वेगाने साथीचे आजार सगळीकडे पसरू लागतात. साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात सतत थकवा अशक्तपणा जाणवू लागतो. मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू हे साथीचे आजार पसरले आहेत. मात्र या आजारांसोबतच चिकनगुनियाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यामध्ये चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मागील तीन वर्षांच्या तुलनेत इतर आजारांसोबत चिकनगुनियाचे रुग्ण सुद्धा वाढू लागले आहेत. आरोग्य विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत 119 तर राज्यात एकूण 900 रुग्ण चिकनगुनियाचे आढळून आले आहेत.(फोटो सौजन्य – istock)
Menopause नंतर महिलांमध्ये वाढतोय Hip Fracture चा धोका, आहाराबरोबरच हवी व्यायामाची जोड
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईनंतर अकोला 109, सांगली मिरज 24 , नाशिक 20, ठाणे 14, जिल्ह्यामध्ये पुण्यात सर्वाधिक रुग्ण असून पुणे जिल्ह्यात 104 रूग्ण, अकोला 85, पालघर 69, सिंधुदुर्ग 44, ठाणे 35 चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले आहेत. घरांमध्ये किंवा अजुआबाजूच्या परिसरात असलेल्या घाणीमुळे डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे वाढली आहेत. यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया इत्यादी रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
राज्यात महापालिका क्षेत्रांमध्ये मुंबईत सार्वधिक डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. या आजारापासून बचाव करण्यासाठी महापालिकेकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र या सर्वच योजना अयशस्वी ठरल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत मुंबईमध्ये 2024 मध्ये चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
‘हा’ भयानक आजार झाल्यानंतर सडून जातात शरीरातील अवयव, योग्य वेळी लक्षणे ओळखून डॉक्टरांचा घ्या सल्ला
१. चिकनगुनिया म्हणजे काय?
चिकनगुनिया एक विषाणूजन्य रोग आहे जो डासांमुळे पसरतो
२. चिकनगुनियाची लक्षणे काय आहेत?
चिकनगुनियाची लक्षणे म्हणजे ताप, सांधेदुखी (विशेषतः हातापायांमध्ये), डोकेदुखी, स्नायूदुखी, पुरळ आणि थकवा.
३. चिकुनगुनिया होऊ नये म्हणून काय करावे?
डासांमुळे होणारे आजार टाळण्यासाठी, मच्छरदाणीचा वापर करा, त्वचेला झाकणारे कपडे घाला आणि डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करा.