हा' भयानक आजार झाल्यानंतर सडून जातात शरीरातील अवयव
जगभरात असंख्य लोक वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आहेत. शरीरात सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांकडे बरीच लोक दुर्लक्ष करतात. सतत दुर्लक्ष केल्यामुळे हेच आजार मोठे स्वरूप घेतात आणि संपूर्ण शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण करतात. शरीराच्या प्रक्रियेमध्ये निर्माण झालेले अडथळे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. मधुमेह हा आजार आरोग्यासाठी अतिशय जीवघेणा आहे. कारण या आजाराची लागण झाल्यानंतर कायम स्वरूपी गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते. याशिवाय आहारात अनेक पथ्य पाळावी लागतात. मधुमेहाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील अतिशय जीवघेणा प्रकार म्हणजे डायबेटीक फुट गँगरीन. हा मधुमेह झाल्यानंतर संपूर्ण शरीराची वाट लागून जाते.(फोटो सौजन्य – istock)
डायबेटीक फुट गँगरीन हा आजार शरीरातील रक्तप्रवाह कमी करून टाकतो. ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. योग्य वेळी ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे डायबेटीक फुट गँगरीन आजाराची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. हा आजार झाल्यानंतर शरीराच्या इतर अवयवांना इजा होते, तर काही वेळा शरीरातील कोणताही अवयव कापून टाकावा लागतो. त्यामुळे मधुमेहसारखा गरम आजार झाल्यानंतर योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे.
डायबेटीक फुट गँगरीनचे प्रमुख कारण म्हणजे नसांमध्ये निर्माण झालेले अडथळे रक्ताभिसरण प्रक्रियेत अनेक अडथळे निर्माण करतो. ज्यामुळे शरीरातील नसा खराब होऊ शकतात. नसा खराब होण्यास सुरुवात झाल्यानंतर पायांना वेदना किंवा दुखापत जाणवून येत नाही. तर लहान जखमांवर उपचार केले जात नाहीत.रक्तभिसरण अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीर त्यांच्याशी लढण्यासाठी सतत प्रयत्न करतो, मात्र ऊतींचा मृत्यू होऊन जातो. ज्यामुळे रक्तभिसरणात अनेक अडथळे निर्माण होतात. बोटं किंवा हातपाय गळून पडू लागतात.