मंत्र उच्चारणाचे शारीरिक आणि मानसिक फायदे
‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः’ हा मंत्र भगवान कृष्णाला समर्पित एक शक्तिशाली मंत्र आहे. सकाळी 24 मिनिटे नियमितपणे जप केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला या मंत्राचा शाब्दिक अर्थ आणि त्याचा जप करण्याचे 5 विशेष फायदे सांगणार आहोत, जे जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच हा पवित्र मंत्र तुमच्या दिनचर्येचा भाग बनवाल.
केवळ अध्यात्मिक नाही तर योगगुरू दीक्षा दाभोळकर यांनी शरीराला या मंत्राने होणारे फायदे सविस्तरपणे सांगितले आहेत. योग आणि मंत्र हे समीकरण नेहमीच उत्तम ठरते. त्यामुळे या मंत्राचे स्पष्ट उच्चारण करत सकाळी जपण्याचे फायदे आपण जाणून घेऊया. हा मंत्र भगवान श्री कृष्णासाठी एक मुक्ती मंत्र आहे ज्यांना वासुदेव (वासुदेव म्हणजे सर्व प्राणिमात्रांचा स्वामी) म्हणूनही ओळखले जाते. त्याचा रोज जप केल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मकता येते. याशिवाय भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वादही प्राप्त होतो असे म्हटले जाते (फोटो सौजन्य – iStock)
आत्मनियंत्रण वाढते
रोज सकाळी तुम्ही उठल्यानंतर योग करावा हे अगदी पूर्वपरंपरेनुसार सांगितले जाते. या योगाभ्यासासह तुम्हा या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीमध्ये आत्म-नियंत्रण वाढते. याशिवाय जीवनातील संघर्ष आणि आव्हानांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वासही वाढतो. तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये अधिक आत्मविश्वास हवा वाटत असेल तर या मंत्राचा जप करण्याने नक्कीच त्याचा प्रभाव लवकर पडतो. किमान एक आठवडा तुम्ही हे करून स्वतःमधील फरक पहा.
रात्रीच्या वेळी मंत्रांचा जप करावा की नाही, जाणून घ्या धार्मिक नियम
अध्यात्मिक प्रसार
ओम नमो भगवते वासुदेवायाचा जप केल्याने तुमच्या मनात भक्ती आणि पूज्यभाव वाढतो. हा मंत्र तुमच्यात अध्यात्माचा प्रसार करतो. या शक्तिशाली मंत्राचा जप केल्याने तुमचे मन आणि आत्मा शुद्ध होतो. तसेच तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येते. माणसाला सध्या जगण्यासाठी सकारात्मकता ही अत्यंत गरजेची आहे आणि अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा नाही. त्यामुळे तुम्ही एक यौगिक क्रियेशी जोडले जाता आणि तुमचे मन शांत होते
सकारात्मकता मिळते आणि तणाव दूर
‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः’ याचा जप केल्याने तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे मानसिक तणाव दूर होतो, ज्यामुळे तुम्हाला मनातून चांगले वाटते. जेव्हा तुम्ही खूपच तणावाखाली असाल तेव्हा तुम्ही रोज सकाळी 24 मिनिट्स या मंत्राचा जप करून पहा तुम्हाला त्वरीत मानसिक शांतता मिळून तणाव दूर झाल्याचा नक्की अनुभव येईल.
वागण्यात सौम्यपणा
या मंत्राचा नियमित जप केल्याने तुमची मानसिक शांती राहते, तेव्हा तुमचे सामाजिक संबंधही सुधारतात. तुमच्या वागण्यात सौम्यता आणि चांगलेपणा अधिक येतो. कोणत्याही गोष्टीचा चहूबाजूने विचार करण्याची क्षमता तुमच्यात येते आणि क्रोधापेक्षा शांतपणे निर्णय घेण्याकडे तुमचा कल राहतो. हा केवळ मंत्र नाही तर तुमची मानसिक शक्ती एकवटण्याचा एक मार्ग आहे.
प्रत्येक वेळी पूजा आणि शुभ कार्यात हवन का केले जाते? काय आहे त्याचे कारण आणि महत्त्व
मानसिक आणि शारीरिक सुधारणा
या मंत्राचा नियमित जप केवळ अध्यात्मिक दृष्टिकोनातूनच फायदेशीर नाही, तर तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती सुधारण्यातही हा मंत्र चांगले काम करतो. यामुळे तुम्हाला मनःशांती मिळते आणि त्याचा मनावर चांगला परिणाम झाल्याने शरीरावरही योग्य परिणाम दिसून येतो आणि तुम्ही कमी आजारी पडता