Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत: हून घेताय ‘ही’ औषधे? जीवावर बेतेल; जाणून घ्या दुष्परिणाम

Avoid These Medicines Taken Without Doctor Advice: डोकेदुखी, ताप किंवा सर्दी-खोकल्यासाठी अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःहून औषधे घेतात. मात्र, अशी सेल्फ मेडिकेशनची सवयीमुळे गंभीर आजरांचा धोका वाढू शकतो.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 03, 2026 | 07:17 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • कोणती औषधे स्वतःहून घेणे टाळावे?
  • काय परिणाम होतो?
  • औषधे घेताना कोणती काळजी घ्यावी?
डोकेदुखी, ताप, सर्दी-खोकला किंवा अंगदुखी यांसारख्या आजारांमध्ये अनेकजण थेट मेडिकल स्टोअरमधून औषधे घेऊन उपचार सुरू करतात. काहीजण जुने प्रिस्क्रिप्शन किंवा इतरांच्या सल्ल्यावरूनही औषधे घेतात. मात्र, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, आजाराचे कारण आणि औषधांची गरज वेगवेगळी असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेण्याची सवय गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

Monsoon Hair Care: पावसात भिजल्यानंतर केसांची काळजी कशी घ्यावी? ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

कोणती औषधे स्वतःहून घेणे टाळावे?

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स, स्टेरॉइड्स, पेनकिलर औषधे, झोपेच्या गोळ्या, हार्मोन्सशी संबंधित औषधे आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करणारी औषधे घेऊ नयेत. या औषधांचा डोस, कालावधी आणि वापर रुग्णाच्या आरोग्यस्थितीनुसार ठरवला जातो.

स्वतःहून औषधे घेतल्याने काय परिणाम होतो?

चुकीचे औषध किंवा चुकीचा डोस घेतल्यास आजाराचे मूळ कारण लपले जाऊ शकते. तसेच औषधांची अॅलर्जी, मळमळ, चक्कर, त्वचेवर पुरळ, यकृत किंवा मूत्रपिंडांवर परिणाम होण्याचा धोका वाढतो. अँटिबायोटिक्सचा अयोग्य वापर केल्यास भविष्यात औषधांचा परिणाम कमी होण्याची शक्यता असते.

औषधे घेताना कोणती काळजी घ्यावी?

  • डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणात आणि वेळेनुसारच औषधे घ्या.
  • औषधांचा कोर्स मध्येच थांबवू नका.
  • दुसऱ्या व्यक्तीची औषधे वापरणे टाळा.
  • औषधाची एक्सपायरी डेट तपासूनच सेवन करा.
  • कोणताही दुष्परिणाम जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

या व्यक्तींनी विशेष सावधगिरी बाळगावी

लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, हृदयरोग, यकृत किंवा मूत्रपिंडाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. अशा व्यक्तींमध्ये औषधांचे दुष्परिणाम अधिक गंभीर ठरू शकतात. कोणताही आजार सतत जाणवत असल्यास किंवा लक्षणे वाढत असल्यास स्वतः उपचार करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हा योग्य पर्याय आहे.

औषधांबाबत स्वतः निर्णय घेणे का टाळावे?

प्रत्येक औषधाचा परिणाम व्यक्तीचे वय, वजन, आधीपासून असलेले आजार आणि सुरू असलेल्या इतर औषधांवर अवलंबून असतो. त्यामुळे एका व्यक्तीसाठी सुरक्षित असलेले औषध दुसऱ्यासाठी धोकादायक ठरू शकते. योग्य निदान आणि आवश्यक तपासणीनंतरच डॉक्टर योग्य औषध व त्याचा डोस निश्चित करतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Facial Icing: चेहऱ्यावर बर्फ लावणे खरोखर फायदेशीर की फक्त ट्रेंड? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Web Title: Health tips self medication dangers doctor advice medicines side effects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • Doctor advice
  • health care news
  • Medicine Strips
  • Medicines Issue

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.