तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्याने आरोग्याला होणारे फायदे
सकाळी उठल्यानंतर अनेकांची सुरुवात चहा प्यायल्याने होते. चहा प्यायल्यानंतर फ्रेश वाटते. पण सतत चहा प्यायल्याने आरोग्याचे गंभीर नुकसान होते. दिवसभरातून ५ ते ६ वेळा चहा प्यायल्यास अपचन,ऍसिडिटी, मळमळणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी काळा चहा प्यावा. काळा चहा प्यायल्याने आरोग्यासंबंधित कोणत्याच समस्या उद्भवत नाहीत. पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चहा पिण्याऐवजी तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्यास आरोग्याला फायदे होतील.
तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे फ्री रॅडिकल्समुळे शरीराचे होणारे नुकसान टाळतात. तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटीबायोटिक गुणधर्म असतात. रिकाम्या पोटी तुळशीच्या चहाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. पावसाळा सुरु झाल्यानंतर सगळीकडे रोगराई, आजार वाढू लागतात. वाढलेल्या आजारांपासून बचाव करण्यासाठी सकाळी उठल्यावर नियमित तुळशीच्या पानांचा चहा प्यावा. हा चहा बनवण्यासाठी सोपा आहे. आज आम्ही तुम्हाला तुळशीचा चहा प्यायल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्याने आरोग्याला होणारे फायदे
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषता लहान मुलं आणि वृद्धांची जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना लगेच कोणताही आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर तुळशीच्या पानांचा काढा प्यावा. तुळशीच्या पानांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्याने आरोग्याला होणारे फायदे
पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाल्ल्यानंतर पचनक्रिया बिघडून जाते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी तुळशीच्या काढ्याचे सेवन करावे. पोट फुगणे, गॅस, अपचन इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळतो. तुळशीच्या चहाचे सेवन केल्यामुळे आतड्यांची पीएच पातळी संतुलित राहते.
वातावरणात बदल झाल्यानंतर लगेच तब्येत खराब होण्यास सुरुवात होते. साथीचे आजार झाल्यानंतर सर्दी खोकला वाढू लागतो. सर्दी खोकला झाल्यानंतर तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्यास आराम मिळतो.
हे देखील वाचा: केस धुतल्यानंतर गळतात का? तर शॅम्पूमध्ये मिक्स करा ‘ही’ माती
मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी तुळशीची पाने वरदान आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागल्यानंतर आरोग्यासंबंधित इतर समस्या जाणवतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी तुळशीच्या पानांचा चहा प्यावा. हा चहा बनवण्यासाठी सोपा आहे.