सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ होटगी रस्त्यावरील एका हॉटेलच्या प्रांगणात पार पडला. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने पारंपरिक पद्धतीने प्रचाराचा नारळ फोडून निवडणूक रणशिंग फुंकण्यात आले. या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रमुख वक्तव्य करत भाजपवर जोरदार टीका केली. समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण होण्यास झालेल्या प्रचंड दिरंगाईमुळे या प्रकल्पाच्या खर्चात अनेकपटीने वाढ झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, विलंबासाठी सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असल्याचा आरोप त्यांनी केला. उजनी धरणातून सोलापूरसाठी पहिली पाईपलाईन काँग्रेसच्या काळातच आणण्यात आली होती, असे सांगत शिंदे यांनी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी काँग्रेसने केलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच दुसरी जलवाहिनी एनटीपीसीच्या निधीतून आणण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. या महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकीत सोलापूरच्या विकासासाठी एकत्रितपणे लढण्याचा निर्धार यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.