Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heart Health: निरोगी हृदयासाठी दररोज करा ‘हे’ व्यायाम ; या गोष्टींचीही घ्या काळजी

Best exercise for Healthy Heart: हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी नियमित कोणते व्यायाम केले पाहिजेत, तसेच कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 30, 2026 | 07:00 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Close
Follow Us:
  • हृदयासाठी नियमित व्यायाम फायदेशीर
  • निरोगी हृदयासाठी करा ‘हे’ व्यायाम
  • या गोष्टींची घ्या काळजी
आजकाल बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, फास्टफूडचे वाढते सेवन आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयविकाराच्या समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. पूर्वी केवळ वृद्धांमध्ये आढळणारे हृदयविकार आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, प्रत्येक व्यायाम हृदयाच्या रुग्णांसाठी सुरक्षित असेलच असे नाही. चुकीच्या पद्धतीने किंवा अतिप्रमाणात केलेला व्यायाम हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण करू शकतो. त्यामुळे हृदयाच्या रुग्णांनी कोणते व्यायाम करावेत, कोणते टाळावेत आणि व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Weight Loss Tips: डाएटिंग करूनही वजन कमी होत नाहीये? जाणून घ्या यामागचे महत्वाचे कारण

हृदयासाठी नियमित व्यायाम फायदेशीर

तज्ज्ञांच्या मते, हृदयाच्या रुग्णांसाठी हलका आणि नियंत्रित व्यायाम सर्वात सुरक्षित ठरतो. दररोज २० ते २० मिनिटे चालणे हा उत्तम पर्याय मानला जातो. नियमित चालल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयावरचा ताण कमी होण्यास मदत होते. याशिवाय हलके सायकलिंग, पोहणे, स्ट्रेचिंग आणि योगा हे व्यायामही फायदेशीर ठरू शकतात. विशेषतः योगा आणि प्राणायामामुळे मानसिक ताण कमी होतो आणि शरीर रिलॅक्स राहते.

योगा

योगा हा तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी एक सर्वोत्तम व्यायाम आहे. नियमित योगा केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे कार्य सुधारते आणि विश्रांतीच्या वेळी हृदयाचे ठोके स्थिर राहतात.

ब्रिस्क वॉक

ब्रिस्क वॉक हा हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर मानला जातो . यामुळे सांध्यांवर जास्त ताण येत नाही. जलद चालण्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि हृदयाचे ठोके वाढतात. हे करण्यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही. सुरुवातीला, प्रत्येक वेळी १०-१५ मिनिटे सामान्य गतीने चाला. हळूहळू हा वेळ ३० मिनिटांपर्यंत वाढवा.

सायकलिंग

सायकलिंगमुळे सांध्यांवरील ताण कमी होतो आणि हृदयालाही फायदा होतो. तुम्ही फिटनेस वॉचच्या मदतीने तुमच्या हृदयाचे ठोके सहजपणे तपासू शकता. ज्यांना संधिवात आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे.

पोहणे

पोहणे हा एक सुरक्षित एरोबिक व्यायाम आहे जो हृदयाच्या रुग्णांसाठी उत्तम मानला जातो. पोहण्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि सूज कमी होते.

कोणती काळजी घ्यावी

हृदयाच्या रुग्णांनी व्यायामाची सुरुवात नेहमी हळूहळू करावी. अचानक जास्त वेळ किंवा वेगाने व्यायाम केल्यास शरीरावर ताण येऊ शकतो. व्यायाम करताना छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे किंवा खूप थकवा जाणवल्यास लगेच थांबणे आवश्यक आहे. तसेच व्यायाम करण्यापूर्वी वॉर्मअप आणि नंतर कूलडाउन करणेही महत्त्वाचे मानले जाते. तसेच, जड वजन उचलणे, अतिशय कठीण वर्कआउट किंवा जास्त दाब येणारे व्यायाम हृदयाच्या रुग्णांनी टाळावेत. अशा व्यायामांमुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे कोणताही नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Weekend Trip: वीकेंड ट्रिपचा प्लॅन करताय? मुंबई-पुणेपासून हाकेच्या अंतरावर आहेत ‘ही’ सुंदर ठिकाणं, ठरतील बेस्ट पिकनिक स्पॉट्स

Web Title: Heart health best exercises for a healthy heart yoga walking cycling swimming tips marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • Beneficial for the heart
  • heart care tips
  • heart problems
  • lifestyle news in marathi

संबंधित बातम्या

Physical Intercourse: पहिली रात्र आणि दूध नक्की काय आहे संबंध? शारीरिक संबंधावर दुधाचा होणारा परिणाम, रिसर्चमधून खुलासा
1

Physical Intercourse: पहिली रात्र आणि दूध नक्की काय आहे संबंध? शारीरिक संबंधावर दुधाचा होणारा परिणाम, रिसर्चमधून खुलासा

Weight Loss Tips: डाएटिंग करूनही वजन कमी होत नाहीये? जाणून घ्या यामागचे महत्वाचे कारण
2

Weight Loss Tips: डाएटिंग करूनही वजन कमी होत नाहीये? जाणून घ्या यामागचे महत्वाचे कारण

Jaggery: एकेकाळी गरीबांचा गूळ, आज आरोग्याचा ‘सुपरफूड’; बाजारात साखर पडली फिकी
3

Jaggery: एकेकाळी गरीबांचा गूळ, आज आरोग्याचा ‘सुपरफूड’; बाजारात साखर पडली फिकी

नसांमधील घट्ट रक्त ठरु शकतं हार्ट अटॅकचे कारण, उष्णतेत कसा वाढतो आजाराचा धोका? डाॅक्टरांनी केलं स्पष्ट
4

नसांमधील घट्ट रक्त ठरु शकतं हार्ट अटॅकचे कारण, उष्णतेत कसा वाढतो आजाराचा धोका? डाॅक्टरांनी केलं स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.