फोटो सौजन्य: I Stock
हाय हिल्स चप्पलना स्त्रियांची सर्वाधिक पसंती मिळते. फॅशन शोज ते लग्नसमारंभ प्रत्येक कार्यक्रमात हाय हिल्स वापरणाऱ्या महिलांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र असं असलं तरी या हाय हिल्सचा इतिहास काहीसा वेगळा आहे बरं का. सध्या महिलांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या हाय हिल्स या खरंतर पुरुषांसाठी पुरुषांनीच तयार केल्या होत्य़ा असं म्हटलं जातं. नक्की या मागे किस्सा काय हे जाणून घेऊयात.
हाय हिल्स चप्पलांचा नक्की इतिहास काय आणि या कशासाठी तयार केल्या गेल्या याबाबत इन्स्टाग्रामवर @shivaniyelwande या अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे. 10 व्या शतकात म्हणजे आजपासून तब्बल एक हजार वर्षापूर्वी पार्शियन सैनिक जेव्हा युद्धाला जायचे तेव्हा घोड्यावरुन धनुष्यबाण मारताना त्यांना कठीण व्हायचं. उंचीमुळे त्यांना अनेक अडचणी निर्माण व्हायच्या. घोड्यावर चढण्यासाठी त्यांनी हाय हील्सची निर्मिती केली. या हाय हिल्सच्या वापरामुळे त्यांना घोड्यावर चढणं सोपं व्हायला लागलं. त्यानंतर कालांतराने हे पार्शियन सैनिक युद्धाव्यतिरिक्त देखील रोजच्या जीवनशैलीत हाय हिल्सचा वापर करु लागले. या हाय हिल्समुळे त्यांच्या उंचीत वाढ दिसायची. त्याचबरोबर या हिल्स त्यांच्या रुबाबदार व्य़क्तीमत्त्वावर प्रभाव टाकत असे.
त्या काळात हाय हिल्स प्रतिष्ठेचे व पुरुषार्थाचे प्रतीक मानले जात. जितकी टाच उंच, तितकी व्यक्ती अधिक श्रीमंत आणि प्रभावशाली मानली जात असे. मात्र, १८व्या आणि १९व्या शतकात स्त्रियांनी हाय हिल्स अधिक प्रमाणात वापरण्यास सुरुवात केली. त्याच वेळी पुरुषांचे फॅशन ट्रेंड बदलले, आणि त्यांनी फ्लॅट किंवा लो-हील बूट वापरण्यास प्राधान्य दिले.त्या काळामध्ये ज्याच्या दारात घोड़े असायाची त्यांना श्रीमंत समजलं जात असायचं. हळूहळू या गोष्टी वाऱ्यासारख्या पसरू लागल्या. त्यानंतर हाय हिल्सबाबतची गोष्ट युरोपीयन आर्मीच्या लक्षात आली. हाय हील्स संकल्पना त्यांना खूुप आवडली. ही संकल्पना युरोपीयन देशांनी स्विकारल्यानंतर हाय हिल्स महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसंती मिळू लागली. अशाच पद्धतीने हाय हील्स ही फॅशन पुरुषांसाठी होती मात्र ती महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आता दिसून येते.
राजघराण्यातील पुरुष तसेच सरदार आणि श्रीमंत लोक हाय हिल्स घालण्यास प्राधान्य देत. १८व्या आणि १९व्या शतकात फॅशनमध्ये मोठे बदल झाले. औद्योगिक क्रांतीनंतर पुरुषांचे कपडे आणि चप्पला अधिक सोयीस्कर आणि आरामदायक बनवण्यावर भर दिला जाऊ लागला. त्याचवेळी हाय हिल्स स्त्रियांच्या फॅशनमध्ये अधिक प्रसिद्ध झाल्या. स्त्रिया अधिक सडपातळ आणि उंच दिसण्यासाठी हाय हिल्स वापरण्यास प्राधान्य देऊ लागल्या. त्यामुळे हळूहळू हाय हिल्स केवळ स्त्रियांसाठी असल्याचा समज रूढ झाला, आणि पुरुष साधे फ्लॅट किंवा लो-हील शूज वापरण्यास लागले.
आजही हाय हिल्स फक्त सौंदर्यासाठी नसून, आत्मविश्वास आणि स्टाइलचे प्रतीक मानल्या जातात. मुख्यतः स्त्रियांसाठीच हाय हिल्स लोकप्रिय असल्या तरी अनेक पुरुषही विविध कारणांसाठी हाय हिल्स वापरतात. फॅशन शो, परफॉर्मन्स, रेड कार्पेट इव्हेंट्स आणि काही सांस्कृतिक परंपरांमध्ये पुरुषांसाठीही हाय हिल्स प्रचलित आहेत.मुळात हाय हिल्सचा इतिहास हा केवळ सौंदर्य नव्हे तर सामाजिक प्रतिष्ठेचा आणि स्टेटसचा भाग राहिला आहे. त्यामुळे फॅशनच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीला स्थायी नियम नसतात. हाय हिल्सचा प्रवास पाहता, त्या फक्त स्त्रियांसाठी आहेत हा समज चुकीचा ठरतो. हाय हिल्स म्हणजे स्टाईल आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे, मग ते पुरुष असोत की स्त्रिया!