World Introvert Day 2026 : तुमच्या मुलाला एकटं राहायला आवडतं का? घाबरू नका, कदाचित तो असू शकतो पुढचा 'एलोन मस्क' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Introvert Day 2026 significance : आज २ जानेवारी! सरत्या वर्षाचा जल्लोष आणि नवीन वर्षाचे स्वागत करून जग आता कामाला लागले आहे. पण, या गोंगाटात स्वतःला रिचार्ज करण्यासाठी शांतता शोधणाऱ्या एका मोठ्या वर्गासाठी आजचा दिवस खास आहे, तो म्हणजे ‘जागतिक अंतर्मुखी दिन’ (World Introvert Day). अनेकदा ज्यांना ‘लाजाळू’, ‘गर्व्हिष्ट’ किंवा ‘एककोंडे’ समजून हिणवले जाते, त्या अंतर्मुखी (Introvert) लोकांच्या सुप्त शक्तीचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे.
आपल्याला असे वाटते की यशस्वी होण्यासाठी खूप बोलणे, लोकांशी पटकन मिसळणे आवश्यक आहे. पण इतिहास वेगळेच सांगतो. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी हे उत्तम उदाहरण आहेत. गांधीजींनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, लहानपणी ते इतके लाजाळू होते की शाळा सुटल्यावर कोणाशी बोलावे लागू नये म्हणून ते पळत घरी यायचे. पण त्यांच्या याच ‘कमी बोलण्याच्या’ स्वभावामुळे त्यांना सत्याचा शोध घेता आला.
आजच्या युगाचे ‘आयर्न मॅन’ एलोन मस्क हे देखील स्वतःला ‘अंतर्मुखी’ मानतात. तासनतास एकटे बसून पुस्तके वाचणे आणि कोडिंग करणे यातूनच ‘स्पेस-एक्स’ सारखे प्रकल्प उभे राहिले. भारताचा लाडका गायक दिलजीत दोसांझ देखील स्टेजवर प्रचंड ऊर्जा दाखवत असला, तरी खासगी आयुष्यात तो अत्यंत शांत आणि मर्यादित लोकांशी बोलणारा आहे. वॉरेन बफेट, आमिर खान आणि मार्क झुकरबर्ग ही नावेही या यादीत आहेत. या सर्वांनी सिद्ध केले की, जगावर राज्य करण्यासाठी आरडाओरडा करण्याची गरज नसते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा
स्विस मानसोपचारतज्ज्ञ कार्ल जंग यांनी १९२१ मध्ये पहिल्यांदा ‘अंतर्मुखी’ (Introvert) आणि ‘बहिर्मुखी’ (Extrovert) हे शब्द जगाला दिले. नाताळ आणि नवीन वर्षाच्या मोठ्या पार्ट्यांमुळे अंतर्मुखी लोकांची ‘सोशल बॅटरी’ पूर्णपणे संपलेली असते. त्यांना पुन्हा स्वतःच्या जगात येऊन शांतता मिळवण्यासाठी २ जानेवारी हा दिवस निवडण्यात आला. २०११ पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा केला जातो.
Low-key celebrating our friends with soft voices but strong minds. Go and embrace the power of quiet. 💞 #WorldIntrovertDay pic.twitter.com/PI5O4GZnk4 — Inquirer (@inquirerdotnet) January 1, 2026
credit : social media and Twitter
मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, अंतर्मुखी लोकांचा मेंदू वेगळ्या पद्धतीने काम करतो. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तप्रवाह हा नियोजन आणि समस्या निवारण (Problem Solving) करणाऱ्या केंद्रांकडे जास्त असतो. ते बोलण्यापूर्वी दहा वेळा विचार करतात, त्यामुळे त्यांचे निर्णय अधिक अचूक असतात. अंतर्मुखी लोक हे उत्तम ‘श्रोते’ (Listeners) असतात, जे समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात जो गुण आजच्या युगात दुर्मिळ होत चालला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Travel Ban : जशास तसे उत्तर! अमेरिकेच्या ‘ट्रॅव्हल बॅन’ला भीक न घालता ‘या’ दोन देशांनीही घातली US citizensवर बंदी
शास्त्रज्ञांनी अंतर्मुखी लोकांना चार श्रेणींमध्ये विभागले आहे: १. सोशल अंतर्मुखी: ज्यांना लहान गटात राहणे आवडते. २. विचार करणारे (Thinking) अंतर्मुखी: जे कल्पक असतात आणि सतत स्वतःच्या विचारात असतात. ३. चिंताग्रस्त (Anxious) अंतर्मुखी: ज्यांना नवीन गर्दीत गेल्यावर असुरक्षित वाटते. ४. संयमी (Restrained) अंतर्मुखी: जे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा खोलवर विचार करतात.
Ans: दरवर्षी २ जानेवारी रोजी जागतिक अंतर्मुखी दिन साजरा केला जातो.
Ans: नाही. अंतर्मुखी असणे हा एक नैसर्गिक व्यक्तिमत्व गुण (Personality Trait) आहे, कोणताही आजार नाही.
Ans: महात्मा गांधी, एलोन मस्क, वॉरेन बफेट, अल्बर्ट आइन्स्टाईन, दिलजीत दोसांझ आणि आमिर खान हे काही जागतिक स्तरावर यशस्वी अंतर्मुखी लोक आहेत.






