Maharashtra breaking News Marathi
02 Jan 2026 10:16 AM (IST)
मराठी माध्यम’ हा चित्रपट नुकताच नवीन वर्षाला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. या चित्रपटाने मराठी भाषेचे महत्त्व, आजची शिक्षणव्यवस्था आणि सामाजिक वास्तव हा गंभीर विषय लोकांना विचार करायला भाग पाडेल आणि सोप्या पद्धतीत मांडला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बजेट पेक्षा जास्त कमाई करून चित्रपटाचे मन जिंकले आहे. तसेच सोशल मीडियावर आणि चित्रपगृहाबाहेर या चित्रपटाचीच चर्चा सर्वत्र होत आहे.
02 Jan 2026 10:07 AM (IST)
गेल्या काही काळापासून सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल त्यांच्या यूजर्ससाठी जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स लाँच करत आहे. या प्लॅन्सची किंमत कमी आणि फायदे जास्त आहेत. सरकारी कंपनी त्यांच्या यूजर्सना असे प्लॅन्स ऑफर करत आहे, जे प्लॅन्स प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्याकडे देखील उपलब्ध नाहीत. बीएसएनएल कमी किंमतीत केवळ जास्तीचा डेटाच देत नाही तर अनलिमीटेड कॉलिंगसह दिर्घकाळ व्हॅलिडीटी देखील ऑफर करते. आता पुन्हा एकदा कंपनी त्यांच्या यूजर्ससाठी खास ऑफर घेऊन आली आहे.
02 Jan 2026 09:40 AM (IST)
ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान लवकरच नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, ते पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहेत. प्रभुदेवा अभिनीत ‘मूनवॉक’ या चित्रपटातून रहमान अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून, हा मनोज एन. एस. दिग्दर्शित विनोदी चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रहमान ‘एंग्री यंग दिग्दर्शक’ची भूमिका साकारणार आहेत.
02 Jan 2026 09:22 AM (IST)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जादूटोण्याचे प्रकार समोर येत असतानाच, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका पराभूत उमेदवाराने जादूटोण्यामुळेच आपला पराभव झाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
02 Jan 2026 09:20 AM (IST)
‘धुरंधर’ चित्रपटातील पात्रे आणि कलाकारांनी यावर्षी विशेष लोकप्रियता मिळवली असून, अक्षय खन्नाच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता दानिश पांडोरने उजैर बलोचची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. दरम्यान, दानिशचे एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्या नात्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी दानिशच्या वाढदिवसानिमित्त संबंधित अभिनेत्रीने त्याच्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत खास नोट लिहिल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
02 Jan 2026 09:15 AM (IST)
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. बंडखोरीचा फटका बसू नये यासाठी सर्व प्रमुख पक्ष अपक्ष अर्ज भरलेल्या नाराज उमेदवारांची मनधरणी शेवटच्या क्षणापर्यंत करत आहेत. त्यामुळे कोणकोणते बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीतील बंडखोर उमेदवारांची नावेही समोर आली आहेत.
02 Jan 2026 09:05 AM (IST)
स्थानिक स्पर्धेत एका क्रिकेटपटूला त्याच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज लावून खेळताना पाहिल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि त्या क्रिकेटपटू आणि स्पर्धेच्या आयोजकांना चौकशीसाठी बोलावले. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, स्थानिक स्पर्धेचा भाग म्हणून आयोजित केलेल्या सामन्यात सहभागी होताना एका क्रिकेटपटूला पॅलेस्टिनी ध्वजासह हेल्मेट घालून पाहिलं गेलं.
02 Jan 2026 09:03 AM (IST)
India Share Market Update: भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज शुक्रवारी, २ जानेवारी रोजी सपाट किंवा मंद पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसानिमित्त बहुतेक जागतिक बाजार बंद होते. आज गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंडने भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सपाट परंतु सकारात्मक सुरुवात दर्शविली आहे. गिफ्ट निफ्टी २६,३१४ वर व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा २३ अंकांनी किंवा ०.०९% ने वाढला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात महाराष्ट्रातील अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना बीड न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. स्वतःला धनंजय मुंडेंची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा मुंडे यांनी दाखल केलेली फौजदारी तक्रार न्यायालयाने फेटाळली आहे. धनंजय मुंडे यांना दिलासा मिळताच आता त्यांच्या मंत्रिमंडळात ‘कमबॅक’ची चर्चा सुरु झाली आहे.






