Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध

हाय हिल्स हे नक्की कधी आणि का निर्माण झाले? तुम्हाला माहीत आहे का इतिहास आणि महत्त्वाचं म्हणजे हे अजिबातच फॅशनसाठी निर्माण करण्यात आले नव्हते आणि महिलांसाठी नव्हते

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 25, 2026 | 09:25 PM
हाय हिल्सचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का (फोटो सौजन्य - Pinterest)

हाय हिल्सचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का (फोटो सौजन्य - Pinterest)

Follow Us
Follow Us:
  • हाय हिल्स हे फॅशनसाठी कधीच बनविण्यात आले नव्हते 
  • हाय हिल्सचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?
  • हाय हिल्स कोणी आणि कधी पहिले घातले?
कोणत्याही कार्यक्रमात हिल्स घालून जायला मुलींना फारच आवडते. फॅशन आणि स्टाईल याचा उत्तम मेळ हिल्स आहेत असं समजण्यात येतं. पण तुम्हाला माहिती आहे का? मुलींच्या या सर्वात आवडत्या हिल्सचा शोध हा मुलींसाठी नाही तर मुलांसाठी सर्वात पहिल्यांदा लावण्यात आला होता. ऐकून धक्का बसला ना? पण हेच सत्य आहे. नक्की याचा काय इतिहास आहे आणि कधी पहिल्यांदा हिल्सचा शोध लावण्यात आला होता आपण जाणून घेऊया. 

हाय हिल्स घालून फॅशन करताय? थांबा, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक वाचा दुष्परिणाम

हाय हिल्सचा इतिहास 

हाय हील्सचा इतिहास खूपच रंजक आहे. १० व्या शतकात पर्शियन घोडेस्वारांनी हाय हिल्स अस्तित्वात आणले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एकेकाळी पुरुषत्व, उच्च सामाजिक दर्जा आणि युद्धाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हील्स आता महिलांच्या फॅशन आणि सौंदर्याचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. हील्सच्या इतिहासाचे काही महत्त्वाचे टप्पे आहेत, ते आपण जाणून घेऊया

कोणते आहेत टप्पे 

  • पहिला टप्पा म्हणजे १० व्या शतकात पर्शियन घोडेस्वारांनी हाय हील्सचा शोध लावला तो मुळात रणांगणावरील युद्धासाठी. जेव्हा पर्शियन सैनिक घोड्यावर स्वार होत, तेव्हा हील असलेले शूज व्यावहारिक कारणांसाठी तयार केले जात असत, जेणेकरून त्यांच्या टाचा रकाबमध्ये व्यवस्थित बसू शकतील.
  • दुसरा टप्पा म्हणजे १७ व्या शतकाच्या सुरुवातीला, युरोपमध्ये पुरुषत्व आणि खानदानीपणाचे प्रतीक हाय हिल्स मानले गेले. पर्शियन संस्कृतीने प्रभावित झालेले युरोपातील सरदार आणि पुरुष हील्स घालू लागले. फ्रान्सचा राजा King Louis XIV लाल रंगाच्या हाय हील्स घालण्यासाठी प्रसिद्ध होता. 
  • तिसरा टप्पा म्हणजे स्त्रियांचा दीक्षाविधी आणि लिंगभेद. १६३० च्या दशकात, युरोपातील स्त्रियांनी पुरुषांचे अनुकरण करत उंच टाचांचे बूट घालण्यास सुरुवात केली, कारण त्यांना पुरुषांच्या फॅशनची नक्कल करून अधिक सशक्त दिसायचे होते. १८व्या शतकाच्या अखेरीस, उंच टाचांच्या बुटांची लिंगानुसार विभागणी झाली: पुरुषांच्या टाचांसाठी मजबूत, चौकोनी असणारे ब्लॉक आणि घोडेस्वारीसाठी हाय हिल्स तर स्त्रियांच्या टाचांसाठी पातळ, टोकदार, आणि नाजूक असे हाय हिल्स. 
जनाब बेगम की हर चीझ से प्यार करते है! हाय हिल्स घालून काकांनी लावली सभेला हजेरी, लोक म्हणाले, “हे तर Pokiee Uncle; Video Viral

पुरुषांनी ते घालणे का बंद केले? 

१९व्या शतकापर्यंत, फॅशनमध्ये एक मोठा बदल झाला होता. समाजाने पुरुषांच्या कपड्यांमध्ये आणि पादत्राणांमध्ये साधेपणा आणि तर्कशुद्धतेला प्राधान्य देण्यास सुरुवात केली. परिणामी, पुरुषांनी हील्स घालणे बंद केले आणि हाय हील्स केवळ महिलांच्या फॅशनचा भाग बनल्या. तर १९५० च्या दशकात आधुनिक स्टिलेटोचे आगमन झाले फॅशनमध्ये क्रांती झाली. हे नाव एका पारंपरिक इटालियन कट्यारावरून प्रेरित होते. आज, हाय हील्स म्हणजे आत्मविश्वास, सौंदर्य आणि ग्लॅमरचे दुसरे नाव झाले आहे. 

Web Title: History of high heels who wore it first and what was the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • fashion tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

How To Identify Real Pearl: मोती खरे की नकली? अस्सल मोती ओळखण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
1

How To Identify Real Pearl: मोती खरे की नकली? अस्सल मोती ओळखण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय
2

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय

Lifestyle Tips : कपड्यांवरील पेनचे डाग चुटकीसरशी होतील गायब; फक्त वापरा ही सोपी घरगुती ट्रिक
3

Lifestyle Tips : कपड्यांवरील पेनचे डाग चुटकीसरशी होतील गायब; फक्त वापरा ही सोपी घरगुती ट्रिक

Mangalagaur: मंगळागौरीला नऊवारी साडीवर परिधान करा ‘हे’ मराठमोळे पारंपरिक दागिने, दिसेल घरंदाज लुक
4

Mangalagaur: मंगळागौरीला नऊवारी साडीवर परिधान करा ‘हे’ मराठमोळे पारंपरिक दागिने, दिसेल घरंदाज लुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.