मध काळीमिरीचे मिश्रण कसे तयार करावे?
चुकीची जीवनशैली जगल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराचे नुकसान होऊ लागते. मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य तो आहार आणि चांगल्या सवयी फॉलो करून जीवन जगणे आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये पिवळा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. हा थर जमा झाल्यानंतर शरीराच्या आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: जीम जाणाऱ्यांसाठी 5 उत्तम खाद्यपदार्थ; स्नायूंचा विकास हाच एकला ध्यास
मागील अनेक वर्षांपासून काळीमिरीचा वापर औषध म्हणून केला जात आहे. काळीमिरीमध्ये असलेले गुणधर्म शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी मदत करते. काळीमिरी आणि मधाचे सेवन केल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. मधामध्ये प्रोटीन, विटामिन के, आयरन, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मध अतिशय प्रभावी आहे.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मध काळीमिरी खाल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, जाणून घेऊया.
मध आणि मसाल्यातील काळीमिरी हा पदार्थ सर्वच घरांमध्ये उपलब्ध असतो. किंवा बाजारात सहज काळीमिरी पावडर उपलब्ध होते. वाटीमध्ये एक चमचा मध घेऊन त्यात चिमूटभर काळीमिरी पावडर मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण खा. यामुळे सर्दी खोकला आणि कोलेस्ट्रॉलची समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होईल. वातावरणात बदल झाल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी मध आणि काळीमिरीचे सेवन करावे.
मध आणि काळीमिरीचे मिश्रण खाल्यास कोलेस्ट्रॉलच्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होईल. त्यामुळे आठवड्यातून एकदा मध काळीमिरीचे मिश्रण खाऊ शकता. यामुळे तुमचे इतर आजार बरे होतील. या मिश्रणाचे सेवन केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारून हृदयाच्या ब्लॉकेजची समस्या कमी होते. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहून आराम मिळेल.
हे देखील वाचा: हार्ट फेल आणि हार्ट अटॅकमध्ये काय असतो फरक? कोणता जास्त घातक?
सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर सगळ्यात आधी घरगुती उपाय करण्याचा सल्ला दिला जातो. घरगुती उपाय आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर मध काळीमिरीचे मिश्रण एकत्र खाल्यामुळे सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. शिवाय यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-व्हायरल गुणधर्म आढळून येतात. कळिमिरीचे मिश्रण चाटण म्हणून खाल्यास छातीमध्ये साचून राहिलेला कफ आणि खोकला कमी होण्यास मदत होते.






