Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care Tips: आठवड्यातून किती वेळा केस धुवणे योग्य? रोज केस धुतल्यामुळे उद्भवतात केसांसंबधित ‘या’ गंभीर समस्या

केस आठवड्यातून दोन ते तीन वेळा धुवावे. वारंवार केस धुतल्यास केसांमध्ये कोंडा होऊन केस कोरडे पडतील. त्यामुळे निरोगी केसांसाठी योग्य हेअर केअर फॉलो करणे फार आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 07, 2026 | 01:29 PM
Hair Care Tips: आठवड्यातून किती वेळा केस धुवणे योग्य? रोज केस धुतल्यामुळे उद्भवतात केसांसंबधित 'या' गंभीर समस्या

Hair Care Tips: आठवड्यातून किती वेळा केस धुवणे योग्य? रोज केस धुतल्यामुळे उद्भवतात केसांसंबधित 'या' गंभीर समस्या

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर केसांच्या समस्या वाढू लागतात. सतत येणाऱ्या घामामुळे केस पूर्णपणे ओले होऊन जातात. केस ओले झाल्यानंतर ते व्यवस्थित कोरडे न झाल्यास केसांमध्ये कोंडा होऊन टाळूवर इन्फेक्शन वाढू लागते. गर्मी वाढल्यानंतर येणाऱ्या घामामुळे केस कमजोर होऊन जातात आणि केसांच्या समस्या वाढून केसांचे नुकसान होते. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर किंवा केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. यामुळे फारसा फरक दिसून येत नाही. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधरण्यासाठी कायमच हेअर केअर प्रॉडक्ट वापरणे आवश्यक नसते तर केसांची योग्य पद्धतीने काळजी घेणे, केस स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कामाच्या धावपळीमुळे महिलांना सतत केस स्वच्छ करणे शक्य होत नाही.(फोटो सौजन्य – istock)

केस खूप जास्त कोरडे आणि पातळ झाले आहेत? वाढत्या उन्हाळ्यात घरीच तयार करा नॅचरल हेअर मास्क, केसांची होईल वाढ

महिला आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केस स्वच्छ करतात. पण दीर्घकाळ केस स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी केसांची योग्य निगा राखणे फार आवश्यक आहे. केस स्वच्छ करताना कमीत कमी शाम्पूचा वापर करावा. आठवड्यातील ७ दिवस नेहमीच केस धुतल्यास केसांची मूळ कमकुवत होऊन केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळणार नाही. चला तर जाणून घेऊया आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? याबद्दल सविस्तर माहिती.

आठवड्यातून किती वेळा धुवावे?

आठवड्यातून २ ते ३ वेळा सौम्य शाम्पूचा वापर करून केस धुवावेत. पण ज्यांच्या टाळूवरील त्वचा खूप जास्त तेलकट किंवा चिकट आहे, अशांनी एक दिवस आड करून केस पाण्याने स्वच्छ करावेत. जर तुमचे केस कोरडे किंवा कुरळे असतील तर आठवड्यातून दोनदा किंवा तीनदाच केस स्वच्छ करावे. निरोगी केसांसाठी माइल्ड किंवा नैसर्गिक शाम्पूचा वापर करावा. यामुळे केसांना कोणतीही हानी पोहचणार नाही.

केसांना शाम्पू करण्याची योग्य पद्धत:

घाईगडबडीमध्ये केसांवर थेट शाम्पू लावून केस स्वच्छ केले जातात. पण असे करणे केसांसाठी धोक्याचे आहे. केसांवर थेट शाम्पू लावल्यामुळे केस अतिशय कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. केसांची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. याशिवाय केसांमध्ये खूप जास्त कोंडा होतो. त्यामुळे केस धुवताना शाम्पू कायमच पाण्यात मिक्स करून घ्यावा. त्यानंतर केसांवर लावून केस स्वच्छ धुवावे. यामुळे केस गळती थाबण्यासोबतच केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळतो.

कडाक्याच्या उन्हामुळे केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत? केस कायमचे ताजेतवाने ठेवण्यासाठी फॉलो करा तज्ज्ञांनी दिलेल्या टिप्स

केस धुवण्याच्या एक दिवस आधी रात्री झोपताना केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत सगळीकडे तेल लावून हलक्या हाताने केसांवर मसाज करावा. मसाज केल्यामुळे केसांमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळते. वारंवार तुमचे केस गळत असतील तर कांद्याच्या रसात तेल मिक्स करून केसांवर लावावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How many times a week should you wash your hair washing your hair every day causes serious hair problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
1

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
2

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
3

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम
4

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.