Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात चेहरा किती वेळा स्वच्छ करावा? सतत चेहरा धुतल्यास त्वचेचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या सविस्तर

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर त्वचा खूप जास्त तेलकट होऊन जाते. अशावेळी त्वचा पाण्याने स्वच्छ केली जाते. वारंवार पाण्याने त्वचा धुतल्यामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी होऊन जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 19, 2026 | 08:42 AM
उन्हाळ्यात चेहरा किती वेळा स्वच्छ करावा? सतत चेहरा धुतल्यास त्वचेचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या सविस्तर

उन्हाळ्यात चेहरा किती वेळा स्वच्छ करावा? सतत चेहरा धुतल्यास त्वचेचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर त्वचा खूप जास्त टॅन झाल्यासारखी वाटते आणि चेहऱ्यावर घामामुळे तेलकटपणा आणि चिकटपणा वाढू लागतो. चेहऱ्यावर वाढलेले अतिरिक्त तेल त्वचेचे गंभीर नुकसान करून टाकते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची काळजी घेणे खूप जास्त आवश्यक आहे. चेहऱ्यावर जमा झालेले अतिरिक्त तेल त्वचेमध्ये तसेच साचून राहिल्यामुळे पिंपल्स, मुरूम आणि त्वचेसंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये जास्त लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने समस्या आणखीनच वाढू लागतात आणि त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)

Skin Care Tips: चाळीशीनंतरही चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? डाएटमध्ये करा ‘या’ पदार्थांचा समावेश

उन्हाळ्यात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर घाम, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे चेहऱ्यावर घाण साचून राहण्यास सुरुवात होते. त्वचेवर वाढलेला चिकटपणा कमी करण्यासाठी वारंवार चेहरा पाण्याने स्वच्छ केला जातो. यामुळे त्वचेवरील घाण स्वच्छ होते, पण त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये त्वचा व्यवस्थित स्वच्छ करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया दिवसभरात किती वेळा त्वचा पाण्याने स्वच्छ करावी.

चेहरा जास्त धुतल्याने उद्भवणाऱ्या समस्या:

आपल्यातील अनेकांना कायमच चेहऱ्यावर पाणी मारण्याची सवय असते. सतत चेहरा पाण्याने किंवा फेस वॉश करून धुतल्यामुळे चेहऱ्यावरील आवश्यक तेल नष्ट होऊन जाते. ज्याच्या परिणामामुळे त्वचा खूप जास्त कोरडी होते. त्वचेतील नॅचरल ऑइल कमी झाल्यामुळे स्किनची पीएच लेव्हल बिघडून जाते. त्यामुळे दिवसभरात दोनदा किंवा तीनदाच चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. चेहऱ्यावर सतत फेसवॉश लावू नये. जास्त वेळा फेसवॉश केल्यामुळे चेहरा कोरडा पडण्यासोबतच ताणलेला आणि संवेदनशील होऊन त्वचा खूप जास्त निस्तेज होऊन जाते. त्वचेमधील तेल कमी झाल्यानंतर चेहऱ्यावरील ग्लो नष्ट होऊन जातो. यामुळे त्वचा अधिकच तेलकट होऊन पिंपल्स येतात.

तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात… केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण

दिवसातून एकदा किंवा दोनदाच चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. सतत चेहरा धुतल्यामुळे त्वचेच्या समस्या वाढू लागतात. सकाळी उठल्यानंतर, दुपारच्या वेळी आणि रात्री झोपण्याआधी चेहरा फेसवॉश करून स्वच्छ करावा. याशिवाय तेलकट त्वचा असल्यास जेलबेस फेशवॉशचा वापर करावा. तसेच जास्त घाम किंवा धूळ मातीच्या संपर्कात गेल्यानंतर त्वचा साध्या पाण्याने स्वच्छ करावी. फेसवॉश निवडताना त्वचेला सूट होईल अशाच फेसवॉशची निवड करावी. हानिकारक केमिकल असलेले फेसवॉश वापरू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How often should you wash your face in summer constant washing of the face will cause serious damage to the skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • home remedies
  • skin care tips
  • summer care tips

संबंधित बातम्या

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर
1

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
2

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर
3

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर
4

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.